Maharashtra Rain : मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट, पाच दिवस ‘कोसळधार’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईसह कोकणाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, मुंबई उपनगरं, ठाणे, पालघर या भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अशात आता हवामान विभागाने मुंबईसाठी आजचा आणि मंगळवारचा दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर कोकणासाठीही ऑरेंज अलर्ट दिला आहे.

ADVERTISEMENT

के. ए. होसाळीकर यांनी काय म्हटलं आहे?

२० जून पासून राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. IMD कडून पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. असं होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवार, मंगळवारी मुंबई आणि उपनगरांमध्ये चांगलाच पाऊस पडेल हा अंदाज व्यक्त करणअयात आला आहे. तर कोकणातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नैऋत्य मान्सून १९ जून गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भातला उर्वरित भाग, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणकी काही भागात पुढे सरकला आहे. मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरीही राज्यात सक्रिय झालेला नाही अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

गेल्या अनेक दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी शहरात हजेरी लावली. त्यानंतर ढगाळ वातावरण असलं तरीही पावसाने दडी मारली होती. मात्र मुंबईत रविवारी जोरदार पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत २४ तासात सांताक्रूझ केंद्रात १२.५ मिमी, कुलाबा केंद्राने ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस चांगला पडल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. २० ते २३ जून या कालावधीच चांगला पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT