महाराष्ट्रात दिवसभरात १५ हजारांहून जास्त Corona पॉझिटिव्ह रूग्ण
महाराष्ट्रात दिवसभरात १५ हजार ८१७ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. बुधवारी १३ हजारांपेक्षा जास्त, गुरूवारी १४ हजारांपेक्षा जास्त तर शुक्रवारी १५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण राज्यभरात वाढले आहेत. आज राज्यात ११ हजार ३४४ रूग्ण बरे झाले […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात १५ हजार ८१७ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. बुधवारी १३ हजारांपेक्षा जास्त, गुरूवारी १४ हजारांपेक्षा जास्त तर शुक्रवारी १५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण राज्यभरात वाढले आहेत. आज राज्यात ११ हजार ३४४ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण २१ लाख १७ हजार ७४४ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट ९२.७९ टक्के इतकं झालं आहे.
महाराष्ट्रात आज ५६ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या २.३१ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७३ लाख १० हजार ५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ८२ हजार १९१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४२ हजार ६९३ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कोरोना अपडेट: महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद?
आज राज्यातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १ लाख १० हजार ४८५ इतकी झाली आहे. आज राज्यात १५ हजार ८१७ रुग्णांची नोंद जाली आहे त्यामुळे कोरोना रूग्णांची एकूण संख्या ही २२ लाख ८२ हजार १९१ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ५६ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे ४८ तासांतील आहेत. तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू हे आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत. हे १६ मृत्यू पुणे ७, ठाणे ६, नागपूर २ आणि परभणी १ असे आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा..
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई ११ हजार ८३
ठाणे ११ हजार ४२२
पुणे २१ हजार ७८८
नाशिक ५ हजार २७२
जळगाव ४ हजार ८०२
औरंगाबाद ५ हजार ५६९
अमरावती ४ हजार २०६
अकोला ३ हजार ८४६
नागपूर १५ हजार ११
ADVERTISEMENT