महाराष्ट्रात 3 हजारांपेक्षा जास्त नवे Corona रूग्ण रूग्ण, 58 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात 3276 नवे कोरोना रूग्ण दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात 3723 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज 58 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 60 हजार 735 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.24 टक्के झाला आहे.

ADVERTISEMENT

आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 79 लाख 92 हजार 10 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 41 हजार 119 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 59 हजार 120 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1483 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज घडीला राज्यात 37 हजार 984 सक्रिय रूग्ण आहेत.

मुंबईत 454 नवे रूग्ण

हे वाचलं का?

मुंबईत 454 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आज दिवसभरात 580 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 17 हजार 521 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर मुंबईत आज घडीला 4676 सक्रिय रूग्ण आहेत.

राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार

ADVERTISEMENT

राज्यात ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळं उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध नियमावली ठरवून देत सरकारने या दोन्ही गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत.त्यानंतर आता बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच चित्रपटगृह आणि नाट्यगृह यांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृहं 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरूवात ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, निर्णय स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर अखेर सरकारने शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शिक्षण विभागाने यासंबंधी नियोजन केलं होतं. त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली असून, ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. ग्रामीण भागात पाचवी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. तर शहरी भागात आठवी ते १२वी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

राज्यात मंदिरं सुरू करण्याचा निर्णय

राज्यात मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत उतार येत असला तरीही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली असती तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशक वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असंही सरकारने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT