मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांच्या दारी वेगळी ‘गुढी’, शेलारांनी सांगितला कार्यक्रम
Ashish Shelar: ‘हिंदूच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा मुंबई भाजपाच्या वतीने दणक्यात साजरा करण्यात येणार असून, मुंबईत भाजपाचे कार्यकर्ते एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार आहेत,’ अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी मंगळवारी (21 मार्च) भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पक्षाच्या […]
ADVERTISEMENT

Ashish Shelar: ‘हिंदूच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा मुंबई भाजपाच्या वतीने दणक्यात साजरा करण्यात येणार असून, मुंबईत भाजपाचे कार्यकर्ते एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार आहेत,’ अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी मंगळवारी (21 मार्च) भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
आशिष शेलार म्हणाले, “आता हिंदू सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरे केले जात आहेत. हिंदू सणांमध्ये नागरिकांचा मोठा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती आदी सण उत्सव जल्लोषात साजरे करण्यात आले.”
मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत जाणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका
