Mumbai vaccination : मुंबई ठरली देशात ‘नंबर वन’! लसीकरणाचा विक्रम; आयुक्तांनी दिली माहिती

मुंबई तक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी देशात व राज्यात लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनंही तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कंबर कसली असून, इतर उपाययोजनांबरोबरच महापालिकेनं लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवत एक नंबर कामगिरी केली आहे. दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीनंतर तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रतिबंधात्मक उपायांचा महत्त्वाचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी देशात व राज्यात लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनंही तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कंबर कसली असून, इतर उपाययोजनांबरोबरच महापालिकेनं लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवत एक नंबर कामगिरी केली आहे.

दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीनंतर तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रतिबंधात्मक उपायांचा महत्त्वाचा भाग असलेल्या लसीकरण मोहिमेवर लक्ष्य केंद्रीत करत मुंबई महापालिकेनं मोठी मजल मारली आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी माहिती दिली आहे. मुंबई जिल्ह्यात शनिवारी (४ सप्टेंबर) एकाच दिवशी 1.3 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, ‘मुंबईत आज (4 सप्टेंबर) 1.3 लाख लसी देण्यात आल्या आहेत. आनंदाची बाब म्हणजे बृहन्मुंबई महापालिका हद्दीतील लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या एकूण नागरिकांपैकी 80 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे’, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp