मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांचे हाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवाळीच्या सुट्टीनंतर मुंबईकर चाकरमानी कामावर परतत आहेत. मात्र आज सकाळीच कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. दीड तासापासून अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. अखेर रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला. आता रेल्वेची सेवा पूर्ववत करण्यात आली.

ADVERTISEMENT

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी काय म्हटलं आहे?

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की S-3 सीएसएमटी कर्जत लोकलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रेल्वे विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरूस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर ८ च्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

शिवाजी सुतार यांनी बिघाडाविषयीही माहिती दिली

शिवाजी सुतार यांनी तांत्रिक बिघाडाबाबत आधीही माहिती दिली होती. डाऊन मार्गावर अंबरनाथ-बदलापूर दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाने दुरूस्ती सुरू केली आहे.

हे वाचलं का?

रेल्वे प्रशासनानं तात्काळ तांत्रिक बिघाड दूर केला असून लोकल सेवा पूर्ववत झाल्याची माहिती शिवाजी सुतार यांनी दिली आहे. अशातच लोकल सेवा पूर्ववत झाली असली तरी लोकल काही काळ विलंबानंच धावत आहेत. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT