Mumbai : लोकलमध्ये थरकाप उडवणारी घटना; अपंग व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai Local Viral Video :

ADVERTISEMENT

मुंबई : चालत्या लोकलमध्ये अपंग व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकलमध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी (२५ मार्च) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत प्रमोद वाडेकर (वय ३५) असे जखमी पीडित तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून पीडित तरुणाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.  (An attempt has been made to burn a disabled person alive in a moving local)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल आली असता एका व्यक्तीने खिशातून विशिष्ट रसायनाने भरलेला रुमाल काढून पेटवून दिला. त्यांनी हा रुमाल वाडेकर यांच्या अंगावर फेकला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित प्रमोद वाडेकरला पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या केईएममध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला करणारा व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला असून लोहमार्ग पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Palghar: बॉयफ्रेंडला झाडाला बांधलं अन् गर्लफ्रेंडवर केला गँगरेप

तब्बल १२ तास बेडच मिळाला नाही :

सुरुवातीला पोलिसांनी प्रमोद वाडेकर यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना तब्बल १२ तास उपचारांसाठी बेडच उपलब्ध झाला नाही. अखेर इथे उपचार होणार नाही असं सांगण्यात आल्यानंतर त्यांनी प्रमोद वाडेकरला पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे सकाळी ११ च्या सुमारास त्यांना बेड मिळाला.

हेही वाचा : मृत्यूपूर्वी आकांक्षा पार्टीत खुश होती; नंतर असं काय झालं की तिने आत्महत्या केली?

मुंबई लोकलचे वैशिष्ट्य :

मुंबई लोकल नेटवर्क हे जगातील सर्वात व्यस्त आणि दाट लोकवस्तीचे रेल्वे नेटवर्क आहे. यामध्ये पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीन मुख्य मार्गांचा समावेश आहे आणि 300 किमी पेक्षा जास्त अंतर आहे. या गाड्या सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावतात आणि दररोज 7 दशलक्ष प्रवासी वाहतूक करतात.

ADVERTISEMENT

हेही वाचा : मुंबईत भरदिवसा तीन जणांचा खून, 54 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांना संपवलं!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT