मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा निर्णय

मुंबई तक

मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचं कलम १४४ लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कार्यालयाने याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशानुसार शहरात पाचपेक्षा जास्त लोकांना जमण्यास मनाई घालण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळल्यास भरावा लागणार भरमसाठ दंड काय म्हटलं आहे या आदेशात? कोरोनाची साथ वाढत चालली आहे. त्यामुळे माणसाला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचं कलम १४४ लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कार्यालयाने याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशानुसार शहरात पाचपेक्षा जास्त लोकांना जमण्यास मनाई घालण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळल्यास भरावा लागणार भरमसाठ दंड

काय म्हटलं आहे या आदेशात?

कोरोनाची साथ वाढत चालली आहे. त्यामुळे माणसाला जीवाचा धोका निर्माण झाला आहे. तसंच आरोग्य, सुरक्षा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीने मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात येतं आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं म्हणजेच किमान सहा फुटांचे अंतर, चेहऱ्यावर मास्क लावणं आणि कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणं हे सक्तीचं आहे असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp