Mansukh Hiren Case:सचिन वाझेंचा कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी आरोप झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATS नेही सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील कारवाईची शक्यता लक्षात घेऊन सचिन वाझे यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ २६ फेब्रुवारीला आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांची आणि सचिन वाझे यांची ओळख होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला. त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेंवर गंभीर आरोप झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे.

सचिन वाझे अडकणार? पाहा काय आहे आतापर्यंतचा घटनाक्रम

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा येथील खाडीत आढळला आहे. या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनातही गंभीर आरोप केले होते. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ, तिथे असणारी दुसरी कार, मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटला कुणाला भेटले? या प्रकरणाचा तपास सचिन वाझे यांच्याकडेच कसा आला? इतके सगळे योगायोग कसे काय? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारले होते. तसंच या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा NIA कडे देण्यात यावा अशीही मागणी आता फडणवीस यांनी केली होती.

ADVERTISEMENT

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाबही विधानसभेत वाचून दाखवला आणि त्यांनी यात मनसुख हिरेन यांचा खून झाला असून तो सचिन वाझेंनी केल्याचा संशय असल्याचीही बाब सभागृहासमोर आणली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर सचिन वाझेंवर कारवाई केली जावी अशी मागणी झाली. गृहखात्याने त्यांची दुसऱ्या खात्यात बदली केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT