मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, लोकल वाहतूक उशिराने, सखल भागात साठलं पाणी
मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी रात्रीपासूनच पावासाच्या सरींवर सरी कोसळत आहेत. मागील काही तासांपासून कोसळधार सुरू आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. त्याचप्रमाणे हार्बर तसंच मध्य लोकल मार्गावरच्या लोकलही २० मिनिटं उशिराने धावत आहेत. धारावी कलानगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहण्यास मिळालं. प्रभादेवी स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर […]
ADVERTISEMENT
मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी रात्रीपासूनच पावासाच्या सरींवर सरी कोसळत आहेत. मागील काही तासांपासून कोसळधार सुरू आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. त्याचप्रमाणे हार्बर तसंच मध्य लोकल मार्गावरच्या लोकलही २० मिनिटं उशिराने धावत आहेत.
ADVERTISEMENT
धारावी कलानगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहण्यास मिळालं. प्रभादेवी स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे. त्यामुळे या भागात ऑफिस असलेल्या लोकांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक भागांमध्येही हीच परिस्थिती आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहण्यास मिळालं. गोरेगाव ते गुंदवली या भागातही वाहनं चालवत असणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे.
हे वाचलं का?
चेंबूर, कुर्ला हायवे, चेंबूर स्टेशन या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं आहे. पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. हिंदमाता भागात नेहमीच पाणी साठतं मात्र रात्रीपासून पाऊस पडत असूनही पाणी न साठल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे. मुंबई महापालिकेने भूमिगत टँकमध्ये साठवण्यास सुरूवात केली आहे त्यामुळे या भागात पाणी साठलेलं नाही.
ADVERTISEMENT
घाटकोपर येथील खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा घरात पाचजण होते. दरडीच्या भागासह एक झाड घरावर कोसळले. या घटनेनंतर घरातले संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. घराचे मोठे नुकसान झाले आहे.
ADVERTISEMENT
मुंबई शहर तसंच उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आज संध्याकाळी 4.10 वाजता भरती येणार असून 4.01 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर, रात्री 10.21 वाजता ओहोटी येणार आहे.
पावसामुळे पाणी साठल्याने बेस्ट बसचे काही मार्ग बदलण्यात आले आहेत. बस क्रमांक 357, 360, 355 (मर्यादित) या बसेस चेंबूर शेल कॉलनी येथून डॉ. आंबेडकर उद्यान मार्गे, चेंबूर नाका ते सुमन नगर पर्यंत धावणार आहेत. तर, सायन रोड क्रमांक 24 येथील सर्व बसेस मुख्य मार्गाने धावणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT