चिखलदऱ्यात लवकरच सुरु होणार २ हजार गणेश मुर्तींचे संग्रहालय
महाराष्ट्रात गणेशोत्सवाला मोठं महत्व आहे. येत्या गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत चिखलदरा भागात गणेश मूर्तींचे संग्रहालय सुरु होणार आहे. अकोल्यातील प्रख्यात व्यवसायीक प्रदीप नंद यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभं राहणार असून विदर्भातला हा पहिलाच उपक्रम असल्याचं बोललं जातंय. भविष्य काळात चिखलदऱ्याच पर्यटनाच्या दृष्टीनेही या संग्रहालयाचा खूप मोठा फायदा होईल अशी आशा नंद यांनी व्यक्त केली आहे. या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला मोठं महत्व आहे. येत्या गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत चिखलदरा भागात गणेश मूर्तींचे संग्रहालय सुरु होणार आहे. अकोल्यातील प्रख्यात व्यवसायीक प्रदीप नंद यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभं राहणार असून विदर्भातला हा पहिलाच उपक्रम असल्याचं बोललं जातंय. भविष्य काळात चिखलदऱ्याच पर्यटनाच्या दृष्टीनेही या संग्रहालयाचा खूप मोठा फायदा होईल अशी आशा नंद यांनी व्यक्त केली आहे.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना नंद म्हणाले, “लहानपणापासून मला गणेश मूर्ती बनवण्याचा छंद होता. कालांतराने या व्यवसायात शिरल्यानंतर गणेश मूर्ती बनवण्यापासूनच विविध ठिकाणच्या, विविध आकाराच्या गणेश मूर्ती जमवण्याचा छंद मला जडला. आतापर्यंत मी विविध आकाराच्या २ हजार गणेश मूर्ती जमवल्या आहेत. १ इंचापासून ते ५ फुटापर्यंत सर्व मुर्त्यांचा यात समावेश आहे. काच, माती, दगड, लाकूड, धातू, फायबर अशा विविध माध्यमात बनवलेल्या मूर्तींचा यात समावेश आहे.”