दंगलीनंतर अमरावतीत बंधुभावाचे रंग, मुस्लीम व्यक्तींचा देवळासाठी पहारा…हिंदूंची दर्ग्यात गस्त
– धनंजय साबळे, अमरावती प्रतिनीधी त्रिपुरातील मशिदीच्या कथित विटंबनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावती शहरात दोन दिवस झालेल्या दंगलीमुळे सरकारी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दंगलीत काही असामाजिक तत्वांनी मंदिर आणि मशिदीलाही आपलं लक्ष्य केलं. यानंतर पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू करुन संचारबंदी घोषित केली. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असली तरीही काही सुज्ञ हिंदू-मुस्लीम बांधवांनी आपल्या […]
ADVERTISEMENT

– धनंजय साबळे, अमरावती प्रतिनीधी
त्रिपुरातील मशिदीच्या कथित विटंबनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावती शहरात दोन दिवस झालेल्या दंगलीमुळे सरकारी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दंगलीत काही असामाजिक तत्वांनी मंदिर आणि मशिदीलाही आपलं लक्ष्य केलं. यानंतर पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू करुन संचारबंदी घोषित केली.
सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असली तरीही काही सुज्ञ हिंदू-मुस्लीम बांधवांनी आपल्या कृतीमधून सर्वधर्म समभावाचं उदाहरण घालून दिलंय.
अमरावतीच्या हबीब नगर परिसरातील मुस्लीम बांधवांनी आपल्या भागातील शंकराच्या मंदीराबाहेर पहारा घालायला सुरुवात केली असून हिंदू लोकं दर्ग्यात गस्त घालत आहेत. संचारबंदीमध्ये आपल्या विभागातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण कोणीही बिघडवू नये यासाठी ही लोकं जिवापाड मेहनत घेत आहेत. वळगाव रोड परिसरात हिंदू लोकसंख्या अत्यंत कमी आहे. परंतू दंगलीदरम्यान काही लोकांनी या भागातील देवळाला लक्ष्य करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला.