मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा शिंदे सरकारने वाढवली, अनेक बड्या नेत्यांची सुरक्षा काढली
राज्यातल्या सत्तांतरानंतर अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेत. महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेले निर्णय बदलत शिंदे-फडणवीसांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्के दिले. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील काही मोठ्या नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आलीये. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आलीये. महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब […]
ADVERTISEMENT

राज्यातल्या सत्तांतरानंतर अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेत. महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेले निर्णय बदलत शिंदे-फडणवीसांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्के दिले. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील काही मोठ्या नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आलीये. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आलीये.
महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस) तिन्ही पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेबद्दल महत्त्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार तुरूंगात असलेले खासदार संजय राऊत, आमदार नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची सुरक्षाही हटवण्यात आलीये.
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत, युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील यांचीही सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.