सामूहिक हत्याकांडाने नागपूर हादरलं, पतीकडून पत्नी आणि मुलांसह सासरच्या मंडळीची हत्या
नागपूरच्या पाचपावली परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलांसह सासरच्या मंडळींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. अमोल मातूरकर असं या आरोपीचं नाव असून रविवारी रात्री त्याने आपल्या सासरी जाऊन हे भयानक कृत्य करुन ५ जणांचा जीव घेतला. सोमवारी दुपारी १ वाजता आजुबाजूच्या परिसरातील लोकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांनी याची माहिती […]
ADVERTISEMENT
नागपूरच्या पाचपावली परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलांसह सासरच्या मंडळींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. अमोल मातूरकर असं या आरोपीचं नाव असून रविवारी रात्री त्याने आपल्या सासरी जाऊन हे भयानक कृत्य करुन ५ जणांचा जीव घेतला.
सोमवारी दुपारी १ वाजता आजुबाजूच्या परिसरातील लोकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आरोपी अलोक मातूरकरने आपली पत्नी विजया, मुलगा साहिल आणि मुलगी परी, सासुबाई लक्ष्मीबाई आणि मेहुणी – अतिशा यांची आधी हत्या केली आणि नंतर गळफास घेतला. अलोकने सासु आणि मेहुणीची हत्या दुसऱ्या ठिकाणी केली यानंतर तो बायको राहत असलेल्या ठिकाणी गेला आणि त्याने तिकडे आपल्या परिवारालाही संपवलं. अलोकने हे पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT