नांदेड: कार आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात दोन पोलीस जागीच ठार
नांदेड: नांदेडमध्ये कार आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त कारमध्ये एकूण चार पोलीस होते. त्यापैकी 2 पोलीस कर्मचारी हे जागीच ठार झाले तर 2 पोलीस कर्मचारी हे गंभीर जखमी झाले आहेत. भोकर-नांदेड महामार्गावरील खरबी गावाजवळ काल (9 जानेवारी) रात्री उशिरा हा अपघात झाला. ही टक्कर इतकी […]
ADVERTISEMENT
नांदेड: नांदेडमध्ये कार आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त कारमध्ये एकूण चार पोलीस होते. त्यापैकी 2 पोलीस कर्मचारी हे जागीच ठार झाले तर 2 पोलीस कर्मचारी हे गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
भोकर-नांदेड महामार्गावरील खरबी गावाजवळ काल (9 जानेवारी) रात्री उशिरा हा अपघात झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारमध्ये बसलेल्या दोन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. दीपक देवानंद जाधव आणि ईश्वर सुदाम राठोड अशी मृत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर अपेक्षा इटग्याळकर आणि सदानंद सपकाळ हे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहेत.
गंभीर जखमी अवस्थेतील दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना महामार्ग पोलिसांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. हे चारही पोलीस भोकर येथे मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा नांदेडच्या दिशेने परत येत असताना खरबी गावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक बसली.
हे वाचलं का?
या अपघातातील जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू
ADVERTISEMENT
दरम्यान, काल लातूर-औरंगाबाद एसटी बसचा देखील भीषण अपघात झाला. ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. तर 14 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. बस आणि ट्रकच्या हा अपघात एवढा भयंकर होता की, ज्यामध्ये संपूर्ण बसचा चक्काचूर झाला. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगावजवळ हा भीषण अपघात झाला होता.
ADVERTISEMENT
सकाळी सात वाजेच्या सुमारास बस क्रमांक एम एच 20 बी एल टी 3017 ही बस लातूर येथून औरंगाबादकडे मार्गस्थ झाली होती. पण सायगावच्या जवळ आंबेजोगाईकडून लातूरकडे लोखंडी पाइपची वाहतूक करणारा एका ट्रकाला बसने रॉंग साईडने येऊन प्रचंड जोरदार धडक दिली.
महाबळेश्वर: ITIच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरच बस आणि ट्रकचा हा अपघात झाला.
अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 17 प्रवासी व 1 बालक प्रवास करत होते. ज्यापैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातनंतर सायगाव येथील नागरिकांनी मात्र जखमींना तात्काळ मदत केली. जखमींना त्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT