Nashik Bus Accident: मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत, घटनेची चौकशी होणार-मुख्यमंत्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला भीषण आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला झाला. या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझं बोलणं झालं आहे या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. सर्व जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये झालेली घटना अत्यंत दुःखद-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सहकारी आ. देवयानीताई फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत.

नेमकी काय घडली घटना?

यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला नाशिक जवळ भीषण अपघात झाला. ही खासगी बस चिंतामणी ट्रॅव्हल्सची होती असं समजतं आहे. धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक लागली त्यानंतर या बसने पेट घेतला. ही खासगी बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती. या बस अपघातात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेतील जखमींना अग्नीशमन दलाकडून शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात ३८ जण जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर झाला अपघात

नाशिक औरंगाबाद रस्त्यावर ही घटना घडली आहे. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरच्या हॉटेल मिरची चौकात ही घटना आज पहाटे घडली. पहाटे ४.३० च्या सुमाराला ही घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

ही बस यवतमाळहून मुंबईला चालली होती. या बसमध्ये साधारण ३० प्रवासी होते. पोलिसांनी ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे असं ट्रॅव्हल्स एजंट शशिकांत देशपांडे यांनी सांगितलं. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शशिकांत देशपांडे हे घटनास्थळी आले. त्यांनी मीडियाशी बोलताना ही सगळी माहिती दिली. यातल्या प्रवाशांची नावं समजू शकलेली नाही. मात्र ही बस यवतमाळचीच होती. बसमधले काही जण हे मुंबईला जाणारे होते तर काहीजण नाशिकला उतरणार होते अशीही माहिती देशपांडे यांनी दिली.

ADVERTISEMENT

DCP अमोल तांबे यांनी काय माहिती दिली?

आज पहाटे नाशिकमधल्या मिरची चौकात एक ट्रॅव्हल बस आणि ट्रेलर यांचा अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दलाचं पथक हे सगळं घटनास्थळी आलं आहे. हा अपघात नेमका कसा झाला आणि अपघातानंतर बसला आग कशी लागली याची माहिती आम्ही घेत आहोत असंही डीसीपी अमोल तांबे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT