Girish Mahajan : देवेंद्र फडणवीसांचे चाणक्य मैदानात; यशस्वी शिष्टाई होणार?

मुंबई तक

मुंबई : अनेक आंदोलन आणि निवडणुका यशस्वीपणे हातळण्याचा अनुभव असलेले नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे पुन्हा संकटमोचकाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. विविध मागण्यांसह नाशिकहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला स्वतः महाजन सामोरे जाणार आहेत. शेकापचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पाॅईंट आॅफ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : अनेक आंदोलन आणि निवडणुका यशस्वीपणे हातळण्याचा अनुभव असलेले नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत विश्वासू मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे पुन्हा संकटमोचकाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. विविध मागण्यांसह नाशिकहुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला स्वतः महाजन सामोरे जाणार आहेत. शेकापचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पाॅईंट आॅफ इन्फाॅरमेशनच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन यांनी याबाबत माहिती दिली. (Nashik-Mumbai Long March minister Girish Mahajan is all set to play the role of troublemaker again)

महाजन म्हणाले, शेतकरी आणि आदिवासींच्या विविध मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा थांबवून यशस्वी तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः या मोर्चाला समोरे जावून शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे. ज्या मागण्या तातडीने मान्य करणे शक्य आहे, अशा मागण्या जागेवरच मान्य केल्या जातील. पायी चालत येणाऱ्या शेतकरी आणि आदिवासी बांधवांना मुंबईत यावे लागू नये, असाच आमचा प्रयत्न असल्याचं उत्तर गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीने सभागृहात दिले.

२०१८ मध्येही गिरीश महाजनांनी केली होती यशस्वी मध्यस्थी :

यापूर्वी २०१८ मध्येही गिरीश महाजन यांनी ‘नाशिक ते मुंबई’ लॉंग मार्चचा यशस्वीपणे हातळला होता. त्यावेळी त्यांनी रस्त्यावर उतरुन पहाटे ४ वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. तसंच शेतकरी आणि सरकारच्या शिष्टमंडळाचाही ते भाग होते. शेतकऱ्यांचे १२ प्रतिनिधी आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार मंत्र्यांमध्ये त्यावेळी चर्चा झाली होती. यात तत्कालिन मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग फुंडकर, गिरीश महाजन यांचा समावेश होता.

Maharashtra Crisis: “त्यांनी 16 आमदारांनाच नोटिसा बजावल्या, कारण…”

हे वाचलं का?

    follow whatsapp