सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा? फडणवीसांनी ३६ दिवसांपूर्वीच दिली होती हिंट
Satyajeet Tambe file nomination for MLC : अहमदनगर : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि आपल्या मुलासाठी मार्ग प्रशस्त करुन दिला. इतकचं नाही तर सुधीर तांबे यांनी काँग्रेसतर्फे सत्यजित तांबे […]
ADVERTISEMENT
Satyajeet Tambe file nomination for MLC :
ADVERTISEMENT
अहमदनगर : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि आपल्या मुलासाठी मार्ग प्रशस्त करुन दिला. इतकचं नाही तर सुधीर तांबे यांनी काँग्रेसतर्फे सत्यजित तांबे यांना पाठिंबाही जाहीर केला.
दुसऱ्या बाजूला अखेरच्या क्षणापर्यंत भाजपनेही नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी पक्षाचा अधिकृत उमेदवारच जाहीर केला नाही. अनेक इच्छुक होते पण भाजपने कोणालाही एबी फॉर्मच दिला नाही. त्यामुळे आता भाजप सत्यजित तांबेंना पाठिंबा जाहीर करणार आहे का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठिंबा मागितला तर नक्की विचार करु, अशी प्रतिक्रिया देऊन सस्पेन्स कायम ठेवला आहे.
हे वाचलं का?
सत्यजीत तांबेंना भाजपचाही पाठिंबा?
राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून भाजप अहमदनगरच्या एका बड्या राजकीय घराण्यातील युवा नेत्याला नाशिक पदवीधर विधानपरिषदेसाठी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. हे युवा नेते सत्यजीत तांबेंच आहेत का? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. मात्र हे नेते सत्यजीत तांबेचं असू शकतात याची हिंट भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३६ दिवसांपूर्वीच दिली होती.
काय घडलं होतं ३६ दिवसांपूर्वी?
काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबेंच्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं होता. त्यावेळी फडणवीसांनी तांबेंना बाळासाहेब थोरातांसमोरच भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती.
ADVERTISEMENT
फडणवीस म्हणाले होते, ‘आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरीही राजकीय कार्यकर्त्यामध्ये एक वेगळेपण असतं ते आपल्याला सत्यजीतमध्ये पाहायला मिळतं. खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात’.
त्यामुळे आता भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष्य लागलं आहे. त्यातच विखे पाटील यांनीही सत्यजीत तांबे यांना पक्षाने सांगितलं तर पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे. सत्यजितशी माझं अद्याप बोलणं झालेलं नाही. पण पक्षाने जर त्यांना पाठिंबा जाहीर केला तर आम्ही त्यांच्यासाठीही काम करु, असं विखे पाटील म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT