नाटू-नाटू फेम अभिनेत्याने RRR सिनेमासाठी किती वर्ष केलं डाएटिंग?
RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला 95व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या गाण्यावर अतिशय दमदार डान्स केला आहे. रामचरणच्या या गाण्यात एवढी उर्जा असण्यामागचे कारण म्हणजे त्यांचा फिटनेस ज्यासाठी त्याने तब्बल 2 वर्ष मेहनत घेतली होती. Aajtak.in ने रामचरणच्या फिटनेस ट्रेनरशी चर्चा केली की रामचरणने कसे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला 95व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.
हे वाचलं का?
अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या गाण्यावर अतिशय दमदार डान्स केला आहे.
ADVERTISEMENT
रामचरणच्या या गाण्यात एवढी उर्जा असण्यामागचे कारण म्हणजे त्यांचा फिटनेस ज्यासाठी त्याने तब्बल 2 वर्ष मेहनत घेतली होती.
ADVERTISEMENT
Aajtak.in ने रामचरणच्या फिटनेस ट्रेनरशी चर्चा केली की रामचरणने कसे प्रशिक्षण घेतले आणि RRR साठी त्याने कोणत्या प्रकारचा आहार घेतला.
चला तर मग जाणून घेऊया रामचरणचा नेमका वर्कआउट आणि डाएट प्लॅन
फिटनेस ट्रेनर राकेश उदियार यांच्या म्हणण्यानुसार, रामचरणने स्वातंत्र्य सैनिकाच्या लूकसाठी एक मस्क्युलर बॉडी बनवली, ज्यासाठी त्याने 3-4 महिने मेहनत घेतली.
दुसरीकडे, जेव्हा तो पोलीस म्हणून दिसला तेव्हा त्याला ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले कारण त्यावेळी लॉकडाऊन सुरू झाले होते.
मस्क्युलर लूकसाठी, रामचरणने जवळपास 2 वर्षे डाएट मोडला नाही. तसंच एकही दिवस चीट मिल घेतलं नाही.
लॉकडाऊनमध्ये रामचरण हा घरीच व्यायाम करायचा, त्यामुळे त्याने आहारावर खूप नियंत्रण ठेवलेलं.
रामचरण नाश्त्यात ओट्स, प्रोटीन शेक, अननस किंवा द्राक्षे घेत असे. स्नॅक्समध्ये पपई किंवा मिक्स बेरी आणि प्रोटीन शेक घेत असे.
दुपारी 12:20 वाजता तो 1 टोस्ट, पनीर, दही घ्यायचा आणि 2.30 वाजता उपमा, सॅलेड, 1 चमचा बटर (उपमा बनवण्यासाठी) घ्यायचा.
दुपारी साडेचार वाजता भाज्यांचे सूप, टोफू, दही घ्यायचा. संध्याकाळी 06.30 वाजता ड्रायफ्रुट्स, 8.30 वाजता भाज्या, मसूर, टोस्ट घ्यायचा.
रात्री 10 वाजता भाज्यांचे सूप, टोस्ट, पनीर, दही घ्यायचा.
याशिवाय सीएलए 2000 मिलीग्राम, ओमेगा 369, झिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी 1000 मिलीग्राम, व्हिटॅमिन ई 400 मिलीग्राम सप्लिमेंट्सही घ्यायचा.
रामचरण हेवी वेट ट्रेनिंग करायचा ज्यात तो रोज एक मोठा मसल्स आणि एक छोटा मसल्स याचं ट्रेनिंग व्हायचं.
वेट ट्रेनिंगसोबतच तो फंक्शनल ट्रेनिंगही करायचा. ज्याने स्नायूंना टोनिंग आणि फॅट बर्नला बरीच मदत झाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT