बोकड, कोंबड्या ठेवून आणि नवस बोलून सरकार पडत नाही, नवाब मलिक यांचं राणेंना उत्तर
देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले. त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे . 23 वर्षांपूर्वी नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि […]
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले. त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे .
23 वर्षांपूर्वी नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या आणि बोकडांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावं लागतं आहे असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
आणखी काय म्हणाले नवाब मलिक?
आमचे महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे आणि ते पाच वर्ष पूर्ण करेल. अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर 25 वर्षांसाठी टिकेल असे जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात सरकार आल्यापासून हे सरकार पडेल अशा वल्गना केल्या जात आहेत. नारायण राणे जे काही बोलले त्याला काही अर्थ नाही. त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली म्हणून ते बोलत आहेत.