गडचिरोली : अपहरण झालेल्या अभियंत्याची नक्षलवाद्यांकडून सातव्या दिवशी सुटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गोरना मनकेली येथून अपहरण केलेल्या अभियंत्याची नक्षलवाद्यांनी बुधवारी सुटका केली. अजय रोशन लकडा असं या अभियंत्याचं नाव आहे. मनकेली भागात पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून बांधण्यात येणाऱ्या मार्गाची पाहणी करण्यासाठी अजय गेले होते. सोबत त्यांचा कार्यालयीन शिपाई लक्ष्मण परतागिरी हा देखील होता.

ADVERTISEMENT

पाहणी करीत असतानाच धनुष्य घेतलेले नक्षली तिथे आले आणि त्यांनी दोघांचेही अपहरण केले. शिपाई लक्ष्मण याची दुसऱ्या दिवशीच सुटका केली, पण अजय यांना बंधक बनवून ठेवले. डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात अनेक ठिकाणी त्याला फिरवण्यात आले. अजय यांची पत्नी अर्पिता यांना या घटनेने मोठा धक्का बसला आणि पतीच्या सुटकेसाठी त्या जंगलात भटकू लागल्या होत्या.

हे वाचलं का?

अर्पिताचा टाहो स्थानिक माध्यमात ठळकपणे उमटला. बातमी नक्षलवाद्यांपर्यंत पोचली आणि आज सातव्या दिवशी नक्षलींनी जनअदालत घेऊन अजय यांची सुटका केली. मात्र या भागात रस्ते आणि पूल बांधण्याची हिंमत यापुढे करायची नाही, असा दम देऊन ही सुटका करण्यात आली.

कोळसा खाणीतला कामगार ते नक्षली चळवळीतला म्होरक्या, जाणून घ्या कोण आहे मिलींद तेलतुंबडे?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT