NCB चे अधिकारी समीर वानखेडेंना सतावतेय अटकेची भीती?
मुंबई: एनसीबीतले दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समीर वानखेडे यांनाच आता अटकेची भीती सतावतेय का? असा सवाल निर्माण झाला. मला चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा कट रचला जातो आहे, माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणत वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. एक पत्र लिहून वानखेडेंनी आपली भीती बोलून दाखवली आहे. या पत्रात काय म्हटलं, पत्राचं टायमिंग काय […]
ADVERTISEMENT

मुंबई: एनसीबीतले दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समीर वानखेडे यांनाच आता अटकेची भीती सतावतेय का? असा सवाल निर्माण झाला. मला चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा कट रचला जातो आहे, माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणत वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे.
एक पत्र लिहून वानखेडेंनी आपली भीती बोलून दाखवली आहे. या पत्रात काय म्हटलं, पत्राचं टायमिंग काय आणि हे संपूर्ण प्रकरण काय, तेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
सेलिब्रिटींविरोधात अंमली पदार्थविरोधी कारवायांमुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे नेहमी प्रकाशझोतात असतात. पण क्रूझवरील ड्रग्स प्रकरणामुळे मात्र ते वादात सापडले आहेत. त्यांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कारवाईभोवती संशय निर्माण करणारी वेगवेगळी माहिती रोजच समोर येते आहे. अशातच आता समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना लिहिलेल्या पत्रात समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणाचा संदर्भ दिला आहे.










