नवाब मलिकांच्या आरोपांना NCB चं उत्तर, म्हणाले ‘ते दोघे तर…’
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)केलेली कारवाई ही पूर्णपणे बनावट आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच भाजपचा कार्यकर्ता आरोपींना घेऊन थेट NCB कार्यालयात कसा घुसला? असा सवालही मलिकांनी केला होता. ज्याला आता एनसीबीने देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. ‘आमच्या संस्थेवर काही आरोप लावण्यात आले आहेत. […]
ADVERTISEMENT

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)केलेली कारवाई ही पूर्णपणे बनावट आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच भाजपचा कार्यकर्ता आरोपींना घेऊन थेट NCB कार्यालयात कसा घुसला? असा सवालही मलिकांनी केला होता. ज्याला आता एनसीबीने देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे.
‘आमच्या संस्थेवर काही आरोप लावण्यात आले आहेत. मी सांगू इच्छितो के ते बिनबुडाचे आहेत. सर्व प्रक्रिया पार पाडून आणि नियम पाळूनच ही कारवाई केली आहे.’ असं एनसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना खेचून एनसीबी कार्यालयात आणणारे दोघे जण कोण आहेत याबाबत थेट काहीही न बोलता एनसीबी अधिकाऱ्यांनी फक्त एवढंच सांगितलं की, ‘सर्व पंचनामे हे कायद्यातील नियमानुसारच बनविण्यात आले आहेत. कायद्यात असा नियम आहे की, स्वतंत्र साक्षीदाराला सामील करता येतं. तर यावेळी ज्या स्वतंत्र साक्षीदारांचा समावेश करण्यात आला त्यांची नावं अशी, किरण गोसावी, मनिष भानुशाली, अबरेज गोमेज, आदिल उस्मानी अशी आहेत.’
म्हणजेच नवाब मलिक यांनी ज्या केपी गोसावी आणि मनिष भानुशाली यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना एनसीबीने स्पष्ट केलं की, हे दोघेही स्वतंत्र साक्षीदार आहेत.