Sameer Wankhede: ‘मलिकांनी एकदा लोखंडवाला मार्केटमध्ये जावं आणि..’, समीर वानखेडे असं का म्हणाले?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवार (2 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा खंडणी वसुलीचे आरोप केले होते. तसेच समीर वानखेडे कोट्यवधी रुपयांचे कपडे आणि बूट वापरतात हे सगळं कुठून येतं? असा सवालही मलिकांनी पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान, याचबाबत समीर वानखेडे यांनीही आपली बाजू […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवार (2 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा खंडणी वसुलीचे आरोप केले होते. तसेच समीर वानखेडे कोट्यवधी रुपयांचे कपडे आणि बूट वापरतात हे सगळं कुठून येतं? असा सवालही मलिकांनी पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान, याचबाबत समीर वानखेडे यांनीही आपली बाजू मांडली आहे.
समीर वानखेडे प्रचंड महागडे कपडे वापरतात या मलिकांच्या आरोपाला उत्तर देताना वानखेडे असं म्हणाले की, त्यांनी एकदा लोखंडवाला मार्केटमध्ये जावं आणि तिथे जाऊन कपड्यांचे दर समजून घ्यावेत. यावेळी वानखेडे असंही म्हणाले की, एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांना अडकविण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता.
‘ड्रग पेडलरच्या मदतीने कुटुंबीयांना अडकविण्याचा प्रयत्न’
समीर वानखेडे म्हणाले, ‘सलमान नावाच्या एका ड्रग्स पेडलरने त्यांच्या बहिणीशी संपर्क साधला होता. परंतु माझी बहिण NDPS च्या केस हाताळत नाही. त्यामुळे तिने त्याची केस घेतली नाही. माझ्या बहिणीने केस घेण्यबाबत त्याला नकार दिला. सलमान नावाच्या या पेडलरने एका मध्यस्थाच्या माध्यमातून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याने केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने मुंबई पोलिसांकडे खोटी तक्रारही केली होती, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही.’