उत्तर प्रदेशात स्वतः प्रचाराला जाणार, समाजवादीसोबत निवडणूक लढवणार-शरद पवार

मुंबई तक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेशसह तीन राज्यात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. एवढंच नाही तर लवकरच आपण उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार असल्याचंही शरद पवार यांनी यावेळी जाहीर केलं. गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेशसह तीन राज्यात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. एवढंच नाही तर लवकरच आपण उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार असल्याचंही शरद पवार यांनी यावेळी जाहीर केलं.

गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले….

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि इतर काही छोट्या-मोठ्या पक्षांसोबत आघाडी करून निवडणुकीला सामोरा जाणार आहे. मी स्वतःही उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेला बदल हवा आहे. निवडणुकीत जनता उत्तर प्रदेशात बदल घडवून आणले असा विश्वास मला आहे. ‘ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp