सांगली महापालिकेत राडा; राष्ट्रवादीचे नगरसेवक अन् राष्ट्रवादीचे महापौर आपापसात भिडले!
सांगली : सांगली महापालिकेमध्ये बुधवारी पार पडलेल्या सभेदरम्यान जोरदार राडा झाला. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे महापौरच एकमेकांना भिडल्याचं पहायला मिळलं. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सभागृहातच महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांना चपलांचा हार दाखवत या हाराचे खरे मानकरी कोण असा प्रश्न केल्यानं मोठा वाद झाला. सांगली-मिरज-कुपवार शहर महानगरपालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती. […]
ADVERTISEMENT
सांगली : सांगली महापालिकेमध्ये बुधवारी पार पडलेल्या सभेदरम्यान जोरदार राडा झाला. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे महापौरच एकमेकांना भिडल्याचं पहायला मिळलं. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सभागृहातच महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांना चपलांचा हार दाखवत या हाराचे खरे मानकरी कोण असा प्रश्न केल्यानं मोठा वाद झाला.
ADVERTISEMENT
सांगली-मिरज-कुपवार शहर महानगरपालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभागृहाबाहेर उभे असणारे पोलीस पाहून नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नागरिकांचे प्रश्न मांडणाऱ्या नगरसेवकाचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बोलावले का? असा आरोप महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्यावर केला. तसंच नगरसेवकांना पोलिसांची भीती दाखवता का? असा जाबही त्यांनी पीठासनावार जाऊन महापौरांना केला. त्यावेळी त्यांनी सभागृहात पीठासनावर असणारा राजदंडही उचण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
मिरजेतील ड्रेनेज कामाच्या प्रलंबित विषयावरून काही दिवसांपूर्वी नागरिकांनी नगरसेवकांच्या फोटोंना चपलांचा हार घातला होता. त्यावरुन संतप्त झालेल्या नगरसेवक थोरात यांनी थेट तो चपलांचा हार सभागृहात आणून महापौरांना दाखवला. आता हा हार कोणाला घालायचा? याचा खरा मानकरी कोण असा प्रश्न उपस्थित केला? यावेळीही मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र जेष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला, परंतु तब्बल दोन तास हा वादंग सुरू होता त्यामुळे सभा चांगलीच वादळी ठरली.
हे वाचलं का?
ड्रेनेज स्वच्छतेसाठी लवकरच अत्याधुनिक रोबो :
दरम्यान, ड्रेनेज स्वच्छतेसाठी लवकरच अत्याधुनिक रोबो महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्व योजनेतून रोबो खरेदीचा ३९ लाख ५२ हजार रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. या रोबोची ३ ठिकाणी यशस्वी चाचणीही घेण्यात आली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ही चाचणी झाली. चाचणीत अवघ्या १५ मिनिटात या रोबोने ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT