Prakash Ambedkar : राष्ट्रवादी दुखावली, ‘मविआ’त ठिणगी! ठाकरेंसमोर संकट
NCP disappointed on Prakash Ambedkar statement about Sharad pawar : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली पक्षातील आमदार, खासदारांसह मोठा गट बाहेर पडल्यानंतर ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पक्षाची बांधणी सुरू केली. त्यासाठी वेगवेगळ्या पक्ष-संघटनांशीही ठाकरेंनी जुळवून घेतलं. पण, वंचित बहुजन आघाडीसोबतच्या (alliance with vanchit bahujan Aghadi) युतीने उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) नवं संकट उभं केलं आहे. प्रकाश […]
ADVERTISEMENT
NCP disappointed on Prakash Ambedkar statement about Sharad pawar : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली पक्षातील आमदार, खासदारांसह मोठा गट बाहेर पडल्यानंतर ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पक्षाची बांधणी सुरू केली. त्यासाठी वेगवेगळ्या पक्ष-संघटनांशीही ठाकरेंनी जुळवून घेतलं. पण, वंचित बहुजन आघाडीसोबतच्या (alliance with vanchit bahujan Aghadi) युतीने उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) नवं संकट उभं केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) लपून राहिली नाही. आंबेडकरांच्या विधानामुळे मविआमध्ये पहिली ठिणगी पडल्याचं दिसत आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगताना दिसत आहे. त्याला कारण ठरलं आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका. आंबेडकरांनी वंचित मविआमध्ये नाही म्हणत थेट शरद पवारांवर टीका केलीये.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबद्दल काय म्हणाले?
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, “एक काळ असा होता की, काहीही घडलं की अमूक अमूक व्यक्तीमुळे घडलं असंच होतं. मी अजून महाविकास आघाडीचा भाग झालो नाहीये आणि माझी होण्याची इच्छाही नाहीये. माझी युती ही शिवसेनेबरोबर आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे. तो त्यांचा प्रश्न आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
हे वाचलं का?
प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा खासदार कसे झाले होते?
“मी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान असं वाचलंय की, वंचित बहुजन आघाडीचं स्वागत आहे, पण जागा वाटप आम्ही करणार नाही. म्हणजे कालपर्यंत मी जे म्हणत होतो की, वंचित चालत नाही. त्यालाच पुष्टी मिळालीये”, असं म्हणत आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
पुढे प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले की, “शिवसेना आणि आमच्यामध्ये जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त आम्ही ते जाहीर करत नाहीये, कारण उद्धव ठाकरेंचा प्रयत्न चाललाय की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा या आघाडीत यावी. त्यामुळे आम्ही हे सध्या जाहीर करत नाहीये. माझा कुणावर विश्वास आणि कुणावर विश्वास नाही, असं माझं नसतं. जुळायचं असेल, तर 100 टक्के जुळलं पाहिजे. बघायचं डावीकडे आणि हात टाकायचा उजवीकडे, अशी व्यवस्था असते ती मला चालत नाही”, म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली.
ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकर शरद पवारांबद्दल काय बोलले?
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षाचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019 च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं.”
ADVERTISEMENT
Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?
आंबेडकरांच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड संतापले
“महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वानं किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वानं शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदरानं बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी.
सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 25, 2023
जयंत पाटील प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर काय म्हणाले?
आंबेडकरांच्या विधानावर बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, “प्रकाश आंबेडकर सध्या उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करत असल्यानं विधान करण्याचा अधिकार राखून ठेवतो. पण, अजित पवार असं कुठं बोलले असतील असं वाटत नाही. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने ही खेळी असू शकते. मात्र, नंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नाही. शिवसेनेचे आमदार गेल्यानं सरकार कोसळलं. राष्ट्रवादीनं शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली”, अशी सावध भूमिका जयंत पाटलांनी मांडली असली, तर त्यांची नाराजी लपून राहिली नाही.
Uddhav Thackeray च्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपला, आता पुढे काय?
उद्धव ठाकरेंसमोर नवं राजकीय संकट
उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली. मात्र, आंबेडकरांसोबतच्या युतीबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीत नाराजी असल्याचं दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं. महत्त्वाचं म्हणजे जागावाटप झालं असल्याचंही स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी कोंडी होताना दिसत आहे.
वंचितसोबतची युती जाहीर करताना उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही जुळून येईल, असं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबद्दल शंका उपस्थिती केलीये. त्यामुळे वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समेट घडवून आणण्याचं मोठं राजकीय संकट ठाकरेंसमोर आहे. ठाकरेंना यात यश आलं नाही, तर मविआला तडेही जाऊ शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT