शरद पवार यांनी ताकद दिलेल्या शिलेदारचा शिंदे गटात प्रवेश होणार : राष्ट्रवादीला मोठा धक्का
सोलापूर : शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते महेश कोठे यांचा लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिला आहे. शिंदेचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूरमध्ये वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मंगेश चिवटे यांनी भाषणाच्या सुरुवातीला […]
ADVERTISEMENT

सोलापूर : शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते महेश कोठे यांचा लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिला आहे. शिंदेचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूरमध्ये वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
मंगेश चिवटे यांनी भाषणाच्या सुरुवातीला महेश कोठे यांच्या नावाचा उल्लेख करताना शहराचे माजी महापौर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे भावी आमदार महेश कोठे असा केला. तसंच त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं. कोठे यांच्या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हिरवा कंदील दिला असल्याची माहिती चिवटे यांनी दिली.
कोण आहेत दिलीप कोठे?
महेश कोठे यांनी सोलापूर शहराचं महापौर पद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय २०१४ पर्यंत सोलापूर काँग्रेसमधील बड्या नेत्यांमध्ये कोठेंचं नावं घेतलं जात होतं. मात्र २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना सोलापूर शहर मध्य विधानसभा शिवसेनेतून तिकिटही देण्यात आलं. मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली.
पुढे २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने महेश कोठे यांच्याजागी दिलीप माने यांना तिकिट दिलं. त्यावेळी महेश कोठे यांनी शिवसेनेत राहून दिलीप माने यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली. दिलीप माने यांच्या पेक्षा अधिक मतं मिळवून दाखवली होती. बंडखोरी करुनही त्यावेळी त्यांच्याकडील महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी कायम राहिली होती.