अजितदादांनी राजकारणात मैत्र जपलं अन् लक्ष्मण भाऊ दोन वेळा आमदार झाले…
(Ajit Pawar Friendship With Laxman Jagtap) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं मंगळवारी निधन झालं. मागील अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सर्वपक्षीय मैत्र असलेला नेता म्हणून जगताप यांना ओळखलं जातं होतं. त्यातही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी असलेलं त्यांचं सख्य पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी अतिशय […]
ADVERTISEMENT

(Ajit Pawar Friendship With Laxman Jagtap)
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं मंगळवारी निधन झालं. मागील अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सर्वपक्षीय मैत्र असलेला नेता म्हणून जगताप यांना ओळखलं जातं होतं. त्यातही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी असलेलं त्यांचं सख्य पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी अतिशय जवळून पाहिलं आहे.
अजित पवार आणि लक्ष्मण जगताप यांच्या मैत्रीचे किस्सेही अनेकदा सांगितले जातात. असाच किस्सा म्हणजे राजकारणाच्या पलिकडे जाऊन अजित पवार यांनी जगताप यांच्याशी मैत्र जपलेलं आणि त्यामुळेच ते दोनवेळा आमदार होऊ शकले होते.
लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून झाली होती. १९८६ ते २००६ अशी सलग २० वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेत ते नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समिती अध्यक्ष, तर २००० ला महापौर झाले. या दरम्यानच्या काळात १९९९ साली त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आज त्यांच्यामुळेच पिंपरी-चिंडवड शहरात राष्ट्रवादीची मोठी ताकद उभी राहु शकली, हे सत्य कोणीही नाकरणार नाही.