नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे खासदार अमोल कोल्हेंकडून आत्मक्लेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Why I Killed Gandhi या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे काही दिवसांपासून चांगलेच वादात अडकले होते. नथुरामाच्या भूमिकेमुळे अमोल कोल्हेंना पक्षांतर्गत विरोधापासून ते सोशल मीडियावरही टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. जनमानसात भूमिकेला होणारा विरोध लक्षात घेता अमोल कोल्हे यांनी एक पाऊल मागे जात दिलगीरी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

खासदार अमोल कोल्हे यांनी देवाळी आळंदी भागात असलेल्या महात्मा गांधींच्या स्मारकाला भेट देऊन आत्मक्लेश करुन घेतला आहे. महात्मा गांधींच्या स्मारकाला भेट देऊन आत्मक्लेश करतानाचा एक व्हिडीओ अमोल कोल्हेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

आपण नथुरामाची भूमिका केली असली तरीही मी त्याच्या विचारधारेचं समर्थन कधीही करणार नाही. अशा क्षुल्लक गोष्टीमुळे महात्मा गांधींचे विचार कधीही पुसले जाणार नाहीत असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. या निमित्ताने आजच्या तरुणाईमध्ये महात्मा गांधींबद्दल असलेली आस्था, निष्ठा बघून मला खूपच आनंद झाला. महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्वच यातून सिद्ध होते, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

हे वाचलं का?

कोल्हेंनी केलेल्या भूमिकेला विरोध होत असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं समर्थन केलं होतं. कोल्हेंनी केलेली भूमिका ही एक कलाकार म्हणून केली आहे आणि त्याकडे त्याच दृष्टीने पाहिलं जावं असं शरद पवार म्हणाले होते. परंतू लोकांमध्ये उमटलेली नाराजी पाहता अमोल कोल्हेंनी आत्मक्लेश करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT