महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, IT विभागाच्या छाप्यांवरून सुप्रिया सुळे गरजल्या
महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पण दिल्लीपुढे कधी झुकला नाही आणि झुकणार नाही अशा शब्दात सुप्रियाताई सुळे यांनी पवार कुटुंबीयांवर होत असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या धाडींचा समाचार घेतला. नवरात्र निमित्त सुप्रिया सुळे या आज ठाण्यातील देवीचे दर्शन घेण्यासाठी ठाण्यात आल्या होत्या. कोरोना महामारीमुळे बंद असलेली मंदिरे प्रदीर्घ काळानंतर घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उघडण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पण दिल्लीपुढे कधी झुकला नाही आणि झुकणार नाही अशा शब्दात सुप्रियाताई सुळे यांनी पवार कुटुंबीयांवर होत असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या धाडींचा समाचार घेतला. नवरात्र निमित्त सुप्रिया सुळे या आज ठाण्यातील देवीचे दर्शन घेण्यासाठी ठाण्यात आल्या होत्या.
कोरोना महामारीमुळे बंद असलेली मंदिरे प्रदीर्घ काळानंतर घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उघडण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आज पाचपाखडी परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरात आरती करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. माझी आई वर्षातून एकदाच नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करायची त्यामुळे नवरात्र म्हणजेच माझी आई असल्याचे भावूक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
सध्या ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर पवार कुटुंबीय असल्याने पवार कुटुंबातील अनेक सदस्यांच्या उद्योगांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पण दिल्लीपुढे कधी झुकला नाही आणि झुकणार नाही अशा शब्दात सुप्रियाताई सुळे यांनी पवार कुटुंबीयांवर होत असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या धाडींचा समाचार घेतला ,तर संघर्ष करणे ही पवार परिवरची खासियत आहे, आम्ही कधी सुडाचं राजकरण केल नाही आणि करणार नाही असे ही सुप्रियाताई यानी सांगितले. ज्या बहिणींच्या घरांवर छापे मारले गेले त्या ज्येष्ठ नागरिक आहेत. पण आम्ही या गोष्टींमुळे डगमगून जाणार नाही. माझ्या बहिणी खंबीर आहेत. जिजाऊ, सावित्रीच्या लेकी आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीने अखेर मंदिर उघडण्याची परवानगी दिल्याने सर्व भाविकांना अतिशय आनंद झाला असून त्याबद्दल त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.