अनाथांची यशोदा सिंधुताई सपकाळ यांचं निधन, शरद पवार ते देवेंद्र फडणवीस सगळ्याच दिग्गजांची आदरांजली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जियो और जिने दो.. असं तत्त्वज्ञान घेऊन जगणाऱ्या आणि हजारो अनाथांना जगवणाऱ्या माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. सिंधुताई यांनी त्यांचं सगळं आयुष्य अनाथांसाठी वेचलं. त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं आहे. त्यानंतर ट्विटरवरून सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली वाहिली जाते आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी सिंधुताईंना आदरांजली वाहिली आहे.

ADVERTISEMENT

अनाथांसाठी आभाळाएवढं कार्य करणाऱ्या सिंधुताई!

काय म्हणाले शरद पवार?

हे वाचलं का?

‘ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

ADVERTISEMENT

‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले.अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले.’

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांनी काय व्यक्त केल्या भावना?

ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे आज निधन झाले. ही बातमी अत्यंत दुःखदायक आहे. त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!

काय म्हणाले जयंत पाटील?

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त दुखःद आहे. स्वतःसाठी जीवन जगण्यापेक्षा इतरांसाठी जीवन व्यतीत करणे खूप कमी जणांना शक्य होते, त्यापैकी एक सिंधुताई सपकाळ होत्या. सिंधुताईंसारखी व्यक्ती महाराष्ट्राच्या भूमीत जन्मली हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

खऱ्या अर्थाने अनाथांची आई म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

वात्सल्यमूर्ती, थोर सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकाली निधनाने हजारो अनाथांची माय हरपली आहे. अनंत अडचणींचा सामना करत त्यांनी हजारो बालकांचा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला होता. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT