PM Narendra Modi : नवीन संसद भवन आत्मनिर्भर भारताचा साक्षिदार – पंतप्रधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

new parliament building inaugration and installed sengol bye pm narendra modi speech
new parliament building inaugration and installed sengol bye pm narendra modi speech
social share
google news

New Parliament Buidling Inaugration PM Narendra Modi Speech : नवीन संसद भवनमध्ये जे लोकप्रतिनिधी बसतील, ते नवीन प्रेरणेसोबत लोकशाहीला नवीन दिशा देण्याचे काम करतील. आपल्याकडे 25 वर्षाचा अमृतकाळ आहे. या 25 वर्षात मिळून भारताला विकसित राष्ट्र बनवायचं,लक्ष मोठं आहे, कठीण पण आहे, देशवासियांना एकत्र यायचं आहे आणि नवीन संकल्प घ्यायचे आहेत आणि नवीन गती पकडायची,असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेत आणि लोकप्रतिनिधींमध्ये भरला आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्धाटन करण्यात आले. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी सेंगोल लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजुला वैदीक मंत्रोच्चारात स्थापित करण्यात आला.य़ा उद्धाटनाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. नवीन संसद भवनावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवा भारत नव लक्ष तयार करतो आहे. जेव्हा भारत पुढे जातो, तेव्हा जग पुढे जातोय. हे भवन आत्मनिर्भर भारताचा साक्षिदार असल्याचे देखील  मोदी यांनी म्हटले आहे.

प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, ते अमर होतात. आज 28 मे 2023 चा हा दिवस तसाच क्षण आहे. देशा स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि देशाला नवीन संसद भवन मिळतोय. हे संसद भवन 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब आहे, असे देखील मोदी म्हणाले आहेत.नवीन संसद नवीन ऊर्जा आणि मजबूती देतेय,त्यामुळे ते नागरीकांच्या विश्वासाला उंची देणार आहे.आपल्याना नेशन फर्स्टने पुढे चालायला हवे. सतत सुधार करावा लागेल,नवीन रस्ते तयार करावे लागतील, देशाचा विकास हेच आमचं ध्येय, असे देखील मोदी म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

गेल्या 9 वर्षात गरीबांचे कल्याण झाले. आज ही भव्य इमारत तयार होत असताना गरीबांसाठी 4 कोटी घरे झाल्याचे मला समाधान आहे. 11 कोटी शौचालयांची निर्मिती, चार लाखापेक्षा रस्ते तयारी झाल्याची देखील मोदी यांनी माहिती दिली.

ADVERTISEMENT

भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • नवा भारत नव लक्ष तयार करतो
  • जेव्हा भारत पुढे जातो, तेव्हा जग पुढे जातोय
  • हे भवन आत्मनिर्भर भारताचा साक्षिदार आहे.
  • लोकसभेत सेंगोलची स्थापणा झाली.
  • या पवित्र सेंगोलला त्याचा मान परत मिळवून दिला.
  • सेंगोल सर्वांना कायम प्रेरणा देईल.
  • ही संसद देशाच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते.
  • जो थांबतो त्याचे भाग्यही थांबते, त्यामुळे चालत राहा
  • स्वातंत्र्याचा अमृतकाळ नवीन दिशा देणार
  • सर्व इच्छा, आकांक्षा पुर्ण करणारा अमृतकाळ
  • गुलामींच्या विचारांना मागे सोडतोय
  • नवीन संसद पाहून प्रत्येत भारतीयांना गर्व होतो.
  • जुन्या संसस भवनात खुप अडचणी येत होत्या.
  • देशाला नवीन संसद भवनाची गरज होती
  • नऊ वर्ष नवनिर्माणाची
  • देशात 30 हजारहून अधित पंचायत भवन बनवणार
  • येत्या 25 वर्षात देशाला विकसित राष्ट्र बनवायचंय.
  • देशाचा विकास हेच आमचं ध्येय
  • नवीन संसद विश्वासाला नवीन उंची देणार आहे,
  • आपल्याना नेशन फर्स्टने पुढे चालायला हवे
  • आपल्याला सतत सुधार करावा लागेल,नवीन रस्ते तयार करावे लागतील
  • नवीन संसद नवीन ऊर्जा आणि मजबूती देतेय

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT