महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय लांबणीवर; घटनापीठासमोरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला

मुंबई तक

शिवसेनेतील फुटीसह राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं असून, बुधवारी (७ सप्टेंबर) पहिली सुनावणी झाली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी महिनाअखेरीस म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेनेची लढाई लांबण्याचीच चिन्हं आहेत. सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेतील फुटीसह राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं असून, बुधवारी (७ सप्टेंबर) पहिली सुनावणी झाली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी महिनाअखेरीस म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेनेची लढाई लांबण्याचीच चिन्हं आहेत.

सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आज स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेऊ द्यावा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटानं केली होती. या मुद्द्यांवर आज न्यायालयात निर्णय होईल असं वाटत होतं. मात्र, आता त्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.

शिवसेना फूट : आज घटनापीठासमोर काय झालं?

घटनापीठासमोर आज पहिल्यांदाच सुनावणी झाली. पाच मिनिटात ही सुनावणी संपली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हं गोठवा, अशी मागणी केली. शिंदे गटाकडून पहिल्यांदाच ही मागणी करण्यात आली आहे.

निवडणुका लक्षात घेता यावर लवकर निर्णय घ्या, असा आग्रह शिंदे गटाकडून धरण्यात आला. त्यावर शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं असल्याचं शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी यांनी म्हटलं. त्यावर तुमचं म्हणणं ऐकून घेऊनच यावर निर्णय घेऊ, असं घटनापीठाने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp