शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरीचं लायसन्स मिळालंय का?
शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का? असा प्रश्न भाजपचे नेते निलेश राणे यांनी विचारला आहे. चालत्या कारमध्ये पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे हे लोक कोण आहेत? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर लावण्यात आले आहे. ही घटना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरची आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का? असं ट्विट करत निलेश […]
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का? असा प्रश्न भाजपचे नेते निलेश राणे यांनी विचारला आहे. चालत्या कारमध्ये पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे हे लोक कोण आहेत? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर लावण्यात आले आहे. ही घटना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरची आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का? असं ट्विट करत निलेश राणे यांनी हा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर यासंदर्भातला एक व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
शिवसेनेचा लोगो असलेल्या एका कारमध्ये दोन व्यक्ती पिस्तुल बाहेर काढून दाखवत आहेत. या कारवर शिवसेनेचा लोगो आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सर्वात आधी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यावर प्रश्न विचारला आहे. तसंच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी असंही जलील यांनी म्हटलं आहे. आता हाच व्हिडीओ पोस्ट करून निलेश राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.
पाहा व्हिडीओ
