राणा चालीसा वाचतात की नाही याच्याशी सर्वसामान्यांना घेणंदेणं नाही; सुजय विखेंचा वेगळा सूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री इथे हनुमान चालीसा पठनाच्या वादातून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हायकोर्टाने झापलं आहे. एकीकडे भाजप या मुद्द्यावरुन शिवसेनेला धारेवर धरत असताना अहमदनगरचे भाजप खासदार यांनी राणा दाम्पत्याला टोलला लगावला आहे.

ADVERTISEMENT

राणा दाम्पत्य चालीसा वाचतात की नाही याच्याशी सर्वसामान्यांना काहीच घेणंदेणं नाही, राजकीय नेत्यांनी सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणं गरजेचं असल्याचं सुजय विखे-पाटील म्हणाले आहेत. ते औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

“आज टीव्हीवर आपल्याला जे पहायला मिळतंय ते बोगसपणा आहे. शेतकऱ्यांच्या वीजेबाबत कोणीही बोलायला तयार नाही. ग्रामीण भागात अजुनही कुठे वीज टिकून राहत नाहीये. दुधाच्या भावाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला हे पहावं लागत आहे. माझी सर्वांनाच विनंती आहे की निर्बंध पाळून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणं गरजेचं आहे. जे काही सुरु आहे त्याच्याशी सर्वसामान्यांना काहीही घेणंदेणं नाही. राणा चालीसा वाचतायत की नाही याच्याशी शेतकऱ्यांना काही घेणंदेणं नाही, त्यांना वीज मिळाली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे.”

हे वाचलं का?

राणांना वॉशरूमलाही जायला दिलं नाही, फडणवीसांचे पोलिसांवर गंभीर आरोप

यावेळी बोलत असताना सुजय विखे पाटलांनी शिवसेना नेतृत्वालाही कानपिचक्या दिल्या आहेत. “सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. ज्यात एका पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून आपल्या नेत्याला सुरक्षीत ठेवत आहेत आणि त्याच सरकारमधला दुसरा पक्ष संकल्प सभा घेतो आहे. मुख्यमंत्र्यांना कळायला हवं की शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर आज निर्णय घेतला नाही तर दोन वर्षांत शिवसेना दिसणार नाही. मुख्यमंत्र्यांना जितकं लवकर कळेल तेवढा लवकर त्यांचा पक्ष सावरेल”, असा टोला विखे पाटलांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

‘दुसऱ्याच्या घरात हनुमान चालीसा वाचून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा का आणता?’ हायकोर्टाने राणांना झापलं

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT