आता कंपन्यांना द्यावे लागणार 6 एअरबॅग्स; कधीपासून होणार नियम लागू, नितीन गडकरींनी तारीख सांगितली
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारमधील एअरबॅग्सबाबत मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपन्यांना आता कारमध्ये किमान सहा एअरबॅग्ज (6 एअरबॅग) द्याव्या लागतील. नितीन गडकरी यांनी 1 ऑक्टोबर 2023 पासून प्रवासी कारमध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. ट्विट करून माहिती शेअर केली केंद्रीय रस्ते वाहतूक […]
ADVERTISEMENT

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारमधील एअरबॅग्सबाबत मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपन्यांना आता कारमध्ये किमान सहा एअरबॅग्ज (6 एअरबॅग) द्याव्या लागतील. नितीन गडकरी यांनी 1 ऑक्टोबर 2023 पासून प्रवासी कारमध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली.
ट्विट करून माहिती शेअर केली
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे ही माहिती शेअर करताना सांगितले की, 1 ऑक्टोबर 2023 पासून कारमध्ये 6 एअरबॅग आवश्यक असतील. एअरबॅग्जबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते, अशी अटकळ आधीच वर्तवली जात होती. परंतु, ती निश्चित मुदतीपेक्षा वाढविण्यात आली आहे. गडकरींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोटार वाहनांमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे, किंमत आणि प्रकार काहीही असो.
याशिवाय केंद्रीय मंत्र्यांनी गुरुवारी आपल्या ट्विटमध्ये ऑटो उद्योगासमोरील जागतिक पुरवठा साखळीतील आव्हानांचाही उल्लेख केला. पुरवठा साखळीतील अडचणी लक्षात घेऊन या प्रस्तावासाठी पुढील वर्षाची ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परिवहन वेबसाइटनुसार, एम-1 श्रेणीतील कार अशा आहेत ज्यात चालकाच्या सीटसह एकूण 8 जागा आहेत.