डोंबिवलीकरांना ओमिक्रॉनचा धसका : पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती अफ्रिकेतून डोंबिवली गाठेपर्यंत काय घडलं?
डोंबिवलीकरांनी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धसका घेतला आहे. साऊथ अफ्रिकेत गेलेला एक डोंबिवलीकर हा परतत असताना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. या रुग्णाच्या परिवारातील सहा जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील एकाचा अहवाल येणं बाकी आहे तर बाकी इतर जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच बाहेरून आलेल्या त्या रुग्णाचा […]
ADVERTISEMENT
डोंबिवलीकरांनी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धसका घेतला आहे. साऊथ अफ्रिकेत गेलेला एक डोंबिवलीकर हा परतत असताना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. या रुग्णाच्या परिवारातील सहा जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील एकाचा अहवाल येणं बाकी आहे तर बाकी इतर जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच बाहेरून आलेल्या त्या रुग्णाचा अहवाल येत्या आठवडाभरात मिळेल अशी माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान हा डोंबिवलीकर प्रवासी साऊथ अफ्रिकेतील केपटाऊनमधून डोंबिवलीमध्ये येईपर्यंत काय काय घडलं ते देखील आता समोर आलं आहे. केपटाऊन ते दुबई, त्यानंतर दिल्ली आणि मग मुंबई असा प्रवास करत हा डोंबिवलीकर रहिवासी डोंबिवलीत पोहचला. प्रवासात आपल्याला ताप आला आहे हे या प्रवाशाला जाणवलं. त्यामुळे दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर या प्रवाशाने कोरोना टेस्ट केली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याने घरी फोन केला आणि माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. घरात कुणीही थांबू नका मी एकटाच थांबणार असल्याचं कुटुंबीयांना कळवलं. बुधवारी हा प्रवासी डोंबिवलीत आला.
हे वाचलं का?
दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती. यामुळे त्याचे सर्व नातलग नातेवाइकांच्या घरी शिफ्ट झाले होते तर तो एकटाच घरी विलगीकरणात राहत होता. त्याला ताप येऊ लागल्याने त्याची कोरोना टेस्ट केली असता कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तातडीने लॅब कडून याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाच परदेशातून आलेला प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णाला पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याचे टेस्टचे नमुने आता जिनोम सिक्वेन्सीग साठी मुंबई येथे प्रयोग शाळेत धाडले जाणार आहेत. या रुग्णाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे डॉ पानपाटील यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT