लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा
भारतात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 415 वर जाऊन पोहोचली आहेत. तर साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या 183 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला असून, याची माहिती केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्राने दिलेल्या माहितीप्रमाणे 183 रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांचं पूर्णपणे लसीकरण […]
ADVERTISEMENT

भारतात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 415 वर जाऊन पोहोचली आहेत. तर साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या 183 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला असून, याची माहिती केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्राने दिलेल्या माहितीप्रमाणे 183 रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांचं पूर्णपणे लसीकरण झालेलं होतं. फक्त लसीकरणाच्या जोरावरच कोरोनाची साथ रोखणं अवघड असल्याचं केंद्रानं ही माहिती देताना म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी रुग्णांबद्दल केलेल्या अभ्यासात आढळून आलेल्या निष्कर्षांची माहिती दिली. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, एकूण रुग्णांपैकी 18 रुग्णांनी प्रवास केलेलाच नाही. यामुळे ओमिक्रॉनचा विषाणू समुहात असल्याचाच हा संकेत आहेत. ज्या रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला. त्यापैकी 87 जणांनी लसीचे दोन्ही डोज घेतलेले होते. तर तीन जण बुस्टर डोज घेतलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
एकून 183 रुग्णांपैकी तीन रुग्ण लस न घेतलेले आहेत, तर दोन जणांनी लसीचा पहिला डोज घेतलेला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे 73 लोकांनी लसीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. 16 लोक लस घेण्यास पात्र नसल्याचं समोर आलं.
डॉ. पॉल यांनी दिला इशारा…