Omicron cases : महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव; रुग्णसंख्या 200च्या पुढे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे ओमिक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी विमानतळांवरच खबरदारी घेतली जात आहे. मात्र, तरीही गेल्या काही दिवसांतच देशातील एकूण रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. देशातील एकूण ओमिक्रॉन रुग्णसंख्या 200च्या वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

आतापर्यंत जगातील 90 देशांमध्ये पोहोचलेल्या ओमिक्रॉनने भारतातील 13 राज्यात शिरकाव केला आहे. आज ओडिशामध्येही ओमिक्रॉनने पाऊल ठेवलं ओडिशामध्ये आज दोन ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले. दोन्ही रुग्ण परदेशातून आले आहेत. यापैकी एक जण नायझेरियातून, तर दुसरा कतारवरून भारतात आलेला आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे देशातील ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 200च्या पुढे गेली आहे. यात महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 54 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 28 बरे होऊन घरी परतले आहेत. दिल्लीतही 54 रुग्ण आढळून आले असून, 12 रुग्ण बरे झाले आहेत. तेलंगाणात 20 रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकात आतापर्यंत 19 रुग्ण आढळून आले. राजस्थानात 18 रुग्ण आढळले आणि सर्व बरे होऊन घरी परतले. केरळात 15, गुजरातमध्ये 14, उत्तर प्रदेशात 2, आंध्रप्रदेशात 1, चंदीगढमध्ये 1, तामिळनाडूमध्ये 1, पश्चिम बंगालमध्ये 1 आणि ओडिशामध्ये 2 असे रुग्ण आढळून आले आहेत.

दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात 34 रुग्ण

ADVERTISEMENT

दिल्लीतील एकूण रुग्णांची 54 वर पोहोचली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येशी तुलना केल्यास प्रत्येक चौथ्या रुग्ण दिल्लीतील आहे. दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात आतापर्यंत 34 रुग्ण ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले. यातील 17 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, ब्रिटनवरून गोव्यात आलेले चार प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्षांच्या पार्श्वभूमीवर रुग्ण आढळून आल्यानं गोव्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

अमेरिकेत पहिला, तर ब्रिटनमध्ये 12 रुग्णांचा मृत्यू

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसाराचा वेग जास्त असला तरी तो जास्त धोकायदायक नसल्याचं सुरुवातीच्या अभ्यासावरून तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. मात्र, तरीही अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अमेरिकेतील पहिला मृत्यू झाला आहेत. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT