Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत, भारत सरकारकडून नव्या गाइडलाइन जारी

मुंबई तक

नवी दिल्ली: ओमिक्रॉन या कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकाराने संपूर्ण जग पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली गेले आहे. दरम्यान, मागील अनुभव पाठिशी असल्याने भारतात तात्काळ याप्रकरणी बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही नवी मार्गदर्शक तत्त्व 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: ओमिक्रॉन या कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकाराने संपूर्ण जग पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली गेले आहे. दरम्यान, मागील अनुभव पाठिशी असल्याने भारतात तात्काळ याप्रकरणी बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही नवी मार्गदर्शक तत्त्व 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Omicron Variant)आढळून येण्याची शक्यता जास्त आहे त्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोव्हिड-19 चाचणी केली जाईल.

दरम्यान, त्या व्यक्तींचा चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत तिथे थांबावे लागेल. तसंच जरी टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्येच राहावे लागणार आहे. तसेच आठव्या दिवशी पुन्हा कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने 12 देशांची यादी तयार केली आहे. जिथे नवीन प्रकारांचा धोका जास्त आहे. यामध्ये यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यासह युरोपातील सर्व देशांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp