'उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात चुकीचे मुद्दे...', पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य, सल्लाही दिला
Prithviraj Chavan on shivsena symbol hearing : 'उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात चुकीचे मुद्दे...', पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात चुकीचे मुद्दे...',
पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
Prithviraj Chavan on shivsena symbol hearing : "शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी चुकीचे मुद्दे मांडले आहेत. एका मिनिटात सुनावणी संपली, जी चार-पाच दिवसांपूर्वी झाली होती. ते म्हणाले आम्ही जानेवारी महिन्यात अॅक्शन घेऊ म्हणाले. म्हणजे सर्व निवडणुका झाल्यानंतर अॅक्शन घेऊ.", असं काँग्रेसचे ज्येष्ठे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोणता युक्तीवाद करायला पाहिजे होते? पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं
"स्थानिक निवडणुका गेली 10 वर्षे झालेल्या नाहीत. भाजपने 73-74 ची घटनादुरुस्ती भाजपने पार मोडून काढली आहे. त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक, पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाहीये. त्यासाठी तुम्ही आमच्या चिन्हाचा निर्णय लवकर द्या", असा युक्तीवाद ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी करायला हवा, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय.
हेही वाचा : नोकरीसाठी आई बनली कसाई, 20 दिवसांचं बाळ झोपलेलं असताना वैनगंगा नदीच्या पूलावरुन फेकलं, संपूर्ण परिसर सुन्न
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह दिल्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकेवर तात्काळ सुनावणी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून अनेक वेळा करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणी 2026 मध्ये घेण्याचा निर्णय दिल्याने ठाकरे गटाची अडचण वाढली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यांसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका येत्या काळात होणार आहेत. अशा निर्णायक टप्प्यावर पक्षाचे मूळ धनुष्यबाण चिन्ह परत न मिळाल्याने ठाकरे गटाच्या रणनीतीवर मोठा परिणाम होणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर मांडणीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.










