Mumbai 1993 Blast मधला आरोपी सलीम गाझीचा कराचीत मृत्यू, छोटा शकीलचा होता निकटवर्तीय

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या 1993 च्या स्फोटातला आरोपी सलीम गाझीचा कराचीमध्ये मृत्यू झाला आहे. डॉन छोटा शकीलचा तो निकटवर्तीय होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे. आज हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 1993 चा स्फोट घडवण्यात त्याचा हात होता. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील हे सगळे पळून गेले त्यावेळी सलीम गाझीही पळून गेला. तो सातत्याने त्याची ठिकाणं बदलत होता. आधी तो दुबईला पळाला होता आणि त्यानंतर पाकिस्तानला पळून गेला. छोटा शकीलच्या बेकायदेशीर कामात त्याला मदत करत होता.

गेल्या काही दिवसांपासून त्याला हाय ब्लड प्रेशर आणि इतर आजारांचा त्रास होत होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्याचा मृत्यू झाला. मुंबई ब्लास्टच्या कटात सलीम गाझी, छोटा शकील, दाऊद, टायगर मेमन या सगळ्यांचा सहभाग होता. या स्फोटात सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाला तर 600 हून जास्त लोक जखमी झाले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन हा अद्यापही कराची किंवा UAE मध्ये लपून बसला आहे.

धारावीचा रहिवासी… ‘दाऊद गँग’ कनेेक्शन… ‘मुंबई’तून निघाला होता दिल्लीला; ATS ची माहिती

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सलीम गाझीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. इंटरपोलद्वारे त्याला पकडण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. मात्र तो त्याची ठिकाणं बदलत होता. अशात तो एजन्सींच्या तावडीतून सुटत होता.

ADVERTISEMENT

2008 मध्ये नेपाळमध्ये दोघांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी हे सांगण्यात आलं होतं की सलीम गाझी आणि रियाज खत्री आहेत. मात्र पुढच्या तपासात हे समोर आलं की अटक करण्यात आलेले दोघे हे नाहीत. त्यामुळे एजन्सींचे हात रिकामेच राहिले होते.

ADVERTISEMENT

छोटा शकीलबाबत सांगायचं झालं तर त्याच्या अनेक निकटवर्तीयांचा गेल्या काही वर्षांमध्ये मृत्यू झाला आहे. सलीम गाझीच्या आधी फहीम मचमचचा मृत्यूही झाला. छोटा शकीलसाठी तोपण जवळचा होता. त्याच्या सगळ्या बेकायदा व्यवसयांमध्ये तो त्याला मदत करत होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT