Nagaland : भाजप-राष्ट्रवादी एकत्र; विरोधक नसलेलं नवं सरकार कसं आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagaland government formation :

कोहिमा : नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (BJP) युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यात एनडीपीपीने २५ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. यानंतर आता विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेससह जनता दल युनाटेड आणि इतर पक्षांनीही एनडीपीपी-भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नागाँडमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात नसणार आहे. (There is no opposition left in Nagaland, all support BJP’s coalition government, NCP also with it

नागालँड विधानसभेत एनडीपीपीने २५, भाजपने १२ आणि त्यानंतर राष्ट्रवादीने ७ जागा जिंकल्या आहेत. तर नॅशनल पिपल्स पार्टीने ५ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय या निवडणुकीत ४ अपक्ष निवडून आले आहेत. सोबतच रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने २, नागा पिपल्स फ्रंटने २ जागा जिंकल्या आहेत आणि जनता दलाला एक जागा जिंकता आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी-भाजप साथ साथ :

विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीने ७ जागा जिंकल्या आहेत. पण राष्ट्रवादीने विरोधात बसण्याऐवजी सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही अटीशिवाय हा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात जिंकून आलेल्या सर्वपक्षीय आमदारांचं सरकार अस्तित्वात येणार आहे.

Nagaland मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? वाचा Inside Story

ADVERTISEMENT

पाच वर्षांत मिळवलं मोठं यश :

यापूर्वी २०१८ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यांच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यानंतर आता थेट सात जागांवर मजल मारली आहे. राष्ट्रवादीच्या या यशाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. 

ADVERTISEMENT

नागालँडमधील यशानंतर आठवलेंचा भाजपला पाठिंबा जाहीर; नड्डांकडे मोठी मागणी

नागालँडमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानेही झेंडा फडकवला आहे. इतिहासात पहिल्यांदाच आठवले यांच्या पक्षाने नागालँडमध्ये २ जागांवर विजय मिळविला आहे. नागालॅंडमध्ये RPI (A) च्या तिकिटावर Y. लिमा ओनेन चँग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधील नोक्सेन (Noksen) जागेवरुन विजय मिळविला आहे. तर इम्तिचोबा (Imtichoba) यांनी तुएनसांग सदर-II (Tuensang Sadar-II seat) ही जागा जिंकली आहे. दरम्यान, या निकालानंतर आता आठवले यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला असून एका मंत्रिपदाचीही मागणी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT