Palghar Firing: चिकन सेंटरच्या मालकावर भर वस्तीत गोळीबार, CCTV मध्ये संपूर्ण थरार कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मोहम्मद हुसेन खान, पालघर

ADVERTISEMENT

पालघर शहरातील एका चिकन सेंटरच्या मालकावर त्याच्यात दुकानात गोळ्यात घालून जीवे मारण्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. ओवेज चिकन सेंटरचा मालक जावेद लुलानीया हे आपल्या दुकानासमोर उभे असताना भर वस्तीत त्यांच्यावर मंगळवारी (16 नोव्हेंबर) रात्री 10च्या सुमारास बाइकवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात जावेद लुलानीया हे गंभीर जखमी झाला होते.

दरम्यान, गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज हे आता ‘मुंबई तक’च्या हाती लागलं आहे. त्यात दोन आरोपी मोटर सायकलवर बसून जावेद लुलानियावर गोळी घालून पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग आला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. हे हल्लोखोर कोण होते आणि त्यांचा हल्ला करण्याचा नेमका हेतू काय होता याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत.

मूळच्या ठाण्यातील MBBS च्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

ADVERTISEMENT

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मूळचा ठाण्यातील रहिवासी असलेल्या MBBS च्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळमध्ये घडली होती. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले होते. यामुळे रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ADVERTISEMENT

डॉ. अशोक पाल असे प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे नाव असून तो मूळ ठाण्याचा रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तो महाविद्यालयाच्या वाचनालयातून वस्तीगृहाकडे जात असताना त्याच्यावर अज्ञात तरुणांनी धारधार शस्त्राने हल्ला केला होता.

दरम्यान, अशोकवर करण्यात आलेल्या हल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर अशोक हा बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. दरम्यान, जेव्हा या घटनेबाबत माहिती मिळाली तेव्हा काही लोकांनी अशोकला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मुंबई : धक्कादायक, माहेरी गेलेल्या पत्नीवर भररस्त्यात वार करत पतीने केली हत्या

दुसरीकडे ही घटना महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना समजताच सर्वांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. या घटनेनंतर प्रचंड संतापल्याचं यावेळी त्यांनी अधिष्ठाता आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेले विद्यार्थी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी ही सुरूच होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT