अज्ञात व्यक्तीनं केला हॉस्पिटलमधील ऑक्सिजन बंद, 2 रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा धक्कादायक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड: नाशिकमधील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असताना आता बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड वार्डात व्यवस्थापनेचा अनागोंदी कारभार रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याचं समोर आलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका अज्ञात व्यक्तीने रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने यात दोन रुग्ण दगावले असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा बंद केला गेल्याचे मान्य केले असले तरी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे मात्र नाकारले आहे. जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये सकाळी अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाला. हा ऑक्सिजन पुरवठा कोणी आणि का बंद केला? हे अद्यापही समजू शकलेले नाही. दरम्यान, त्याच कोव्हिड वार्डातील 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आता हा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

आरोग्य विभाग मात्र ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याचे मान्य करीत असलं तरी रुग्णांचे मृत्यू केवळ ऑक्सिजनभावी झाल्याचे स्वीकारायला तयार नाही. आरोग्य विभाग भलेही मृत्यूचे कारण ऑक्सिजन अभावी नाही असे म्हणत असलं तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी यामुळेच आपली व्यक्ती दगावल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

दुसरीकडे सध्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजनबाबत बऱ्याच गोष्टी घडत असल्याचं समोर आलं आहे. अशावेळी कोव्हिड वॉर्डातील ऑक्सिजन पुरवठा कोणी बंद केला? हे जर रुग्णालय प्रशासनाला कळत नसेल तर रुग्णालयाच्या सुरक्षेवरच गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एखादी अज्ञात व्यक्ती ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्राजवळ पोहचोतच कसा? असा सवाल ही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सध्या ऑक्सिजनबाबतच सर्वच स्तरावर सावळा गोंधळ असल्याचं पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल 22 रुग्णांना गमवावे लागले होते प्राण

ADVERTISEMENT

नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन या शासकीय रूग्णालयात ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजनची गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

डॉ. झाकीर हुसैन रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रूग्णांवर उपचार सुरू होते. रूग्णालयात 150 रूग्णांची क्षमता असताना सकाळी 10 वाजता 157 रूग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील 131 रूग्ण ऑक्सिजनवर होते. तर 15 रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. 21 एप्रिलला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रुग्णालय परिसरात असणाऱ्या ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधील ऑक्सिजन भरला जात होता. पण त्यावेळी अचानक पाईप फुटल्याने ऑक्सिजनची गळती सुरु झाली.

रूग्णालयात जेव्हा ऑक्सिजनची गळती झाली तेव्हा रूग्णालयात एकूण 150 पेक्षा जास्त रूग्ण हे ऑक्सिजनवर होते तर 15 रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. यापैकी आता 22 रूग्णांचा मृत्यू झाला .

जवळजवळ अर्धा तास ही वायूगळती सुरु होती. तब्बल अर्धा तासानंतर रूग्णालयातील टँकची गळती रोखण्यात आली. मात्र तोपर्यंत रूग्णालयातील 22 निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT