फक्त 4 दिवस बाकी…आजच पूर्ण करा ‘हे’ काम,अन्यथा 10,000 रुपयांचा दंड!
Pan Aadhaar Link : 31 मार्च 2023 ही पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. या 4 दिवसात जर पॅन-आधार लिंक करता आले नाही, तर तुम्हाला 10 हजाराचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे या दंडापासून सुटका मिळवण्यासाठी आताच आधार-पॅन लिकं करा.
ADVERTISEMENT

Pan Aadhaar Link Last Date : गेल्या अनेक महिन्यांपासून पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक करण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देते आतापर्यंत अनेक नागरीकांनी पॅन-आधार लिंक करून घेतले आहे,मात्र अद्यापही अनेक जणांचे पॅन-आधार लिंक (Pan Aadhaar Link) व्हायचे बाकी आहेत. अशा नागरीकांजवळ आता अवघे 4 दिवसच उरले आहेत. कारण 31 मार्च 2023 ही पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. या 4 दिवसात जर पॅन-आधार लिंक करता आले नाही, तर तुम्हाला 10 हजाराचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे या दंडापासून सुटका मिळवण्यासाठी आताच आधार-पॅन लिकं करा. (pan aadhaar link only 4 days left last date 31 march not linked till date know about fine)
पॅनअभावी अनेक कामे रखडणार
जर तुम्ही पॅन आधारशी लिंक (Pan Aadhaar Link) केले नसेल तर तुम्हाला 31 मार्चनंतर अनेक आर्थिक कामकाजांच्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण 31 मार्च पॅन कार्ड डिअॅक्टीव्हेट होईल. त्यामुळे डिअॅक्टीव्हेट पॅन कार्डमुळे म्युचुअल फंड, स्टॉक आणि बॅक अकाऊंट उघडण्यास अडचणी येणार आहेत. सध्या पॅन कार्डचा वापर खुप वाढलाय. बॅक अकाऊंट पासून रियल इस्टेट पर्यंत सर्व ठिकाणी पॅन कार्डची गरज भासतेय.
…तर 10 हजाराचा दंड
31 मार्च 2023 आधी जर तुम्ही पॅन-आधारशी लिंक (Pan Aadhaar Link) केले नाही, तर तुम्हाला 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. मात्र इतका मोठा दंड का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे असे आहे की. 31 मार्च आधी जर पॅन आधारशी लिंक झाले नाही तर तुमचे कार्ड डिअॅक्टीव्हेट होऊ शकते. आणि हे डिअॅक्टीव्हेट झालेले कार्ड जर तुम्ही वापरात आणले तर तुम्हाला 10 हजाराचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे हा दंड टाळण्यासाठी आताच पॅन-आधारशी लिंक करा.
हजार रूपये लेट फी
पॅन कार्ड (Pan Card) डिअॅक्टीव्हेट झाल्यावर वापरल्यास आयकर कायद्याच्या 272B अंतर्गत 10 हजार रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच 31 मार्च 2023 पर्यंत तुम्हाला 1000 रूपयांची लेट फी भरून पॅन-आधारशी लिंक करता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBTD)ने 30 जुन 2022 नंतर पॅन-आधार लिंक करण्यासाठी 1000 रूपये आकारण्याचा निर्णय घेतला होता.आता लेट फी विना तुम्हाला पॅन-आधार लिंक करता येणार नाही.