पंढरपूर : पत्नी आणि मुलीचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला अटक
करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे स्वतःच्या पत्नी आणि मुलीचा झोपेतच खून करुन पसार झालेल्या आरोपीला पंढरपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पंढरपुर मधील मंदिराशेजारील संत तुकाराम भवनसमोर करण्यात आली. अण्णासाहेब भास्कर माने असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अण्णासाहेब याने आपली पत्नी लक्ष्मी (वय ३५) आणि मुलगी […]
ADVERTISEMENT
करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे स्वतःच्या पत्नी आणि मुलीचा झोपेतच खून करुन पसार झालेल्या आरोपीला पंढरपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पंढरपुर मधील मंदिराशेजारील संत तुकाराम भवनसमोर करण्यात आली.
ADVERTISEMENT
अण्णासाहेब भास्कर माने असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अण्णासाहेब याने आपली पत्नी लक्ष्मी (वय ३५) आणि मुलगी श्रुती (वय १४) या दोघींचा खून केला.
हा प्रकार उघडीकस आल्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेनंतर अण्णासाहेबचा मोठा मुलगा रोहीत याने आपल्या वडीलांना रक्ताने माखलेल्या कपड्यांसह दुचाकीवरुन जाताना पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. त्यामुळे अण्णासाहेबने आपल्या पत्नी आणि मुलीचा खून कोणत्या कारणासाठी केला याचा पत्ता लागत नव्हता. करमाळा पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी ३ पथकं तयार केली होती. परंतू फरार आरोपीचा पत्ता लागत नव्हता. अखेरीस अण्णासाहेब याचं वर्णन आणि त्याचा गाडीचा क्रमांक व्हॉट्स अप ग्रूपमध्ये व्हायरल करण्यात आला.
हे वाचलं का?
त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी आपल्या पथकाला सतर्क केले होते . दरम्यान , मंगळवारी संशयित माने हा येथील श्री विठ्ठल मंदिराशेजारील संत तुकाराम भवनसमोर उभा असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम यांना मिळाली . तात्काळ ते पोलीस हवालदार मुलाणी , पोलीस नाईक सुनिल जाधव, विनोद पाटील , महिला पोलीस पवार , घुमरे यांच्यासह मंदिराजवळ पोहोचले . त्या ठिकाणी संशयित माने याला वेढा टाकून शिताफिने ताब्यात घेतले .
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT