‘आमचं तर रक्ताचं नातं’, पंकजा मुंडेंनी धनंजय मुडेंना काय दिला सल्ला?
Pankaja munde meet dhananjay munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या (bjp Leader) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातला राजकीय वाद किती टोकाचा आहे, वादाबद्दल तुम्हाला नवं सांगायला नको. भाऊ-बहीण असले… रक्ताचं नातं असलं, तरीही राजकीय मैदानात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दोघांमध्ये शाब्दिक ठिणग्या उडत असतात आणि दोघेही एकमेकांवर टीका करत […]
ADVERTISEMENT
Pankaja munde meet dhananjay munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या (bjp Leader) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातला राजकीय वाद किती टोकाचा आहे, वादाबद्दल तुम्हाला नवं सांगायला नको. भाऊ-बहीण असले… रक्ताचं नातं असलं, तरीही राजकीय मैदानात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दोघांमध्ये शाब्दिक ठिणग्या उडत असतात आणि दोघेही एकमेकांवर टीका करत असतात; मात्र जेव्हा विषय नात्याचा येतो, तेव्हा दोघांचंही हळवं रुप बघायला मिळत. असंच काही घडलं 11 जानेवारी 2023 रोजी!
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री अपघात झाला. मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून परळीला परतत असताना चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात झाला.
या अपघातात धनंजय मुंडेंच्या छातीला आणि पायाला मार लागला… डॉक्टरांच्या माहितीनुसार धनंजय मुंडेंच्या दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. त्यामुळेच त्यांना परळीत प्राथमिक उपचार करून तात्काळ मुंबईत हलवण्यात आलं. त्यांच्यावर सध्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे वाचलं का?
Dhananjay-Pankaja Munde: भावासाठी पंकजाताई थेट रुग्णालयात…
धनंजय मुंडे हे उपचारासाठी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. तब्येतीची विचारपूस केली. अनेक नेते धनंजय मुंडेंच्या भेटीला जात असतानाच बहीण पंकजा मुंडेंही 11 जानेवारी रोजी सायंकाळी धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी पोहोचल्या. या भेटीची राजकीय वर्तुळातच नव्हे, तर जनसामन्यांमध्येही चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘त्यांचा अपघात झालेला मला कळलं, तेव्हा मी नाशिकला होते म्हणून आज मी भेटायला आलेय.’
ADVERTISEMENT
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना सल्लाही दिला. याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘त्यांची तब्येत बरी आहे. मी त्यांना सांगितलं की स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि वाहन व्यवस्थित हाताळा. मी घरगुती भेट दिली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, आमच्यात इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.’
एकनाथ शिंदे म्हणाले, परत ‘करुणा’ दाखवणार नाही; ‘माजलेत बोके’ म्हणणारे धनंजय मुंडे गायब?
आमचं तर रक्ताचं नातं आहे -पंकजा मुंडे
‘त्यांच्या पत्नी तिथे आल्या होत्या. त्यांच्याशी बोलत बसले. मी त्यांची बहीण आहे. मागेही धनंजय अॅडमिट होते, तेव्हाही मी आले होते. राजकारणात सगळेच नेते भेटायला येतात. मी तर घरातली आहे. राजकारणात आमचे विचार नेहमीच वेगळे राहिलेत, पण कोणाला बरं नाही तर भेटणं; ही आपली संस्कृती आहे. आमचं तर रक्ताचं नातं आहे’, असं पंकजा मुंडे धनंजय मुंडेच्या भेटीनंतर म्हणाल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT