BJP ची पंकजाताईंना ‘तशी’ वागणूक, नड्डांच्या सभेत मुंडे समर्थक संतापले
Pankaja Munde Speech and BJP Politics: औरंगाबाद: भाजपची (BJP) महाराष्ट्रात ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) हे महाराष्ट्रात 3 दिवसांचा दौरा करत आहेत. सुरुवातीला त्यांनी चंद्रपूरला सभा घेतली त्यानंतर औरंगाबादेत सभा (Aurangabad Sabha) झाली. या सभेत जे पी नड्डा बोलत असतानाच लोकं सभा सोडून जात असल्याच्याही पाहायला मिळालं. मात्र, या सगळ्यात अजून […]
ADVERTISEMENT
Pankaja Munde Speech and BJP Politics: औरंगाबाद: भाजपची (BJP) महाराष्ट्रात ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) हे महाराष्ट्रात 3 दिवसांचा दौरा करत आहेत. सुरुवातीला त्यांनी चंद्रपूरला सभा घेतली त्यानंतर औरंगाबादेत सभा (Aurangabad Sabha) झाली. या सभेत जे पी नड्डा बोलत असतानाच लोकं सभा सोडून जात असल्याच्याही पाहायला मिळालं. मात्र, या सगळ्यात अजून एक चर्चा रंगू लागली आहे ती म्हणजे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या सव्वा मिनिटांच्या भाषणाची. (pankajatai make your speech in 2 minutes why did bjp partiality behaviour with pankaja munde in jp naddas meeting)
ADVERTISEMENT
सुरुवात कार्यक्रम पत्रिकेपासून झाली. कारण औरंगाबादेत होत असलेल्या नड्डांच्या कार्यक्रम पत्रिकेत पंकजा मुंडे यांचं नावच नव्हतं. ते नसूनही पंकजा मुंडे कार्यक्रमाच्या स्टेजवर दिसत होत्या. आता मुद्दा त्यांच्या भाषणाचा. तर पंकजा मुंडे या कार्यक्रमात बोललल्या ते देखील फक्त एक ते सव्वा मिनिट… आता सव्वा मिनिटात पंकजा मुंडे काय बोलल्या ते पाहा.
“मी नाराज नाही, २०२४ च्या तयारीला लागले आहे” नाराजीच्या चर्चांना पंकजा मुंडेंकडून पूर्णविराम
हे वाचलं का?
‘आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांना आपण ऐकण्यास आलेले आहात आणि पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानण्याचे पक्षाचे आदेश माझ्यावर झाल्यामुळे आदरणीय जे पी नड्डांच्या प्रोटोकॉलमध्ये जे भाषणं होते त्यामध्ये जास्तीची अधिकची वाढ होऊ नये याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी आपला भाषणाचा वेळ बिल्कुल घेणार नाही. फक्त मी नववर्षाच्या शुभेच्छा देते आणि जे पी नड्डाजी हे नववर्षाच्या निमित्ताने पहिल्यांदा ज्या लोकसभा आपण कधीही लढलेलो नाही त्या लोकसभांना लढून जिंकण्याचा संकल्प घेऊन आपल्या शहरामध्ये आले आहेत त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून.. आता हात वर करा, टाळ्या वाजवा.. आणि एक घोषणा माझ्या बरोबर द्या. भारतीय जनता पार्टीचा… भारतमाता की.. धन्यवाद.. जय हिंद, जय महाराष्ट्र!’ असं अगदीच छोटेखानी म्हणजे सव्वा मिनिटांचं भाषण पंकजा मुंडेंनी यावेळी केलं.
‘मोदींनीही ठरवलं तरी मला संपवू शकणार नाही’; ‘घराणेशाही’वरून पंकजा मुंडेंचं विधान
ADVERTISEMENT
दरम्यान, याच सभेत कोणते नेते किती मिनिटे बोलले ते देखील पाहा..
ADVERTISEMENT
-
भागवत कराड – 6 मिनिटे
पंकजा मुंडे – 1 मिनिट
रावसाहेब दानवे – 7 मिनिटे
चंद्रशेखर बानवकुळे – 7 मिनिटे
जे पी नड्डा – 22 मिनिटे
आता या सगळ्या प्रकारानंतर पंकजा मुंडेंचे कार्यकर्तेही चांगलेच संतापले. त्यांनी ‘मुंबई Tak’ला प्रतिक्रिया देताना पाहा कसा व्यक्त केला संताप…
‘आम्ही सभा बघितली.. पण पंकजा ताईंना काय दोन शब्द बोलू दिले फक्त. पंकजा ताई दोनच शब्दात निघून गेल्या. आमची जी कर्जमाफी आहे ती देखील दिलेली नाही. जी रेग्युलर 50 हजार देणार होते ती कर्जमाफी सुद्धा दिलेली नाही. जी थकबाकी होती ती पण माफ केलेली नाही आम्हाला. काय बसावं वाटत नाही, काय इच्छाच नाही ना आता..’ अशा शब्दात पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
कार्यक्रम पत्रिकेत नाव नसणं, तरीही कार्यक्रमाला येणं, कार्यक्रमाला येऊनही फक्त 1 मनिटाचं भाषण करणं, या सगळ्यावर पंकजा मुंडे काय बोलणार, हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र, या सगळ्यावरुन पुन्हा एकदा अशी चर्चा सुरु झाली आहे की, पंकजा मुंडेंना पक्ष राजकारणातून पूर्णपणे बाजूला तर करत नाही ना?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT